डीकेटीईचा आणि थरमॅक्स यांच्यामध्ये हीटींग डीव्हीजन क्षेत्रात सामंजस्य करार
इचलकरंजी /जेडी न्यूज वृत्तसेवा :
डीकेटीई व थरमॅक्स यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला या कराराचे आदानप्रदान करताना डीकेटीई संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे, डॉ एल.एस. आडमुठे थरमॅक्सचे भरत फाटक व इतर मान्यवर |
येथील डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी आणि थरमॅक्स लि. पुणे यांच्या बरोबर सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे हीटींग डीव्हीजन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण डीकेटीई येथे थरमॅक्स या कंपनीद्वारे उपलब्ध होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उदयोजकता विकास होवून, उर्जा क्षेत्रातील कार्यरत इंडस्ट्रिमध्ये नोकरीची संधी मिळण्यास मदत होणार आहे तसेच हा कोर्स पूर्ण केलेल्या काही विद्यार्थ्यांना थरमॅक्स लि.पुणे येथे नोकरीची संधी मिळणार आहे या कोर्सचा फायदा मेकॅनिकल इंजिनिअरींग व इलेक्ट्रीलच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.थरमॅक्स कंपनी ही उर्जा क्षेत्रातील एक नामवंत कंपनी असून त्यांची वार्षिक उलाढाल ५.५ अब्ज रुपये इतकी आहे आणि उर्जा क्षेत्रातील नवनविन आणि अदयायवत तंत्रज्ञानामध्ये ही कंपनी अग्रेसर आहे. जगातील ७५ देशामध्ये ही कंपनी कार्यरत आहे. उर्जा क्षेत्रातील या अदययावत तंत्रज्ञानाचा फायदा मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना होण्यासाठी या कराराअंतर्गत पॉवर प्लॉट इंजिनिअरींग हा कोर्स डीकेटीईतील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग आणि थरमॅक्स यांच्या परस्पर सहकार्याने साकारणार आहे यामुळे पॉवर प्लॉट इंजिनिअरींग या विषयाच्या प्रॅक्टीकल ज्ञानामध्ये भर पडणार आहे.
सध्या इंडस्ट्रीमध्ये पॉवर जनरेशन क्षेत्राची मागणी वाढली आहे. ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी नवीन कल्पनांना विचारात घेवून समाजाला उपयोगी पडणारे प्रकल्प बनविण्यासाठी थरमॅक्स ही कंपनी येथील तज्ञ अभियंत्यांचे भविष्यात मार्गदर्शन देणार आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानांच विविध नामांकित कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्यामध्ये डीकेटीई ही संस्था नेहमीच आघडीवर आहे
या कराराप्रसंगी संस्थेच्या सचिव प्रा. डॉ. सौ. सपना आवाडे यांनी स्वागत केले. या करारासाठी थरमॅक्सच्या वतीने भरत फाटक (बिझनेस हेड हिटींग सर्व्हिसेस), डीकेटीईच्या संचालिका डॉ.सौ.एल.एस. आडमुठे यांनी स्वाक्षरी केल्या यावेळी मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक, टीपीओ जी.एस.जोशी,प्रा.अभिजीत कोथळी,प्रा. मनोज चौगुले,थरमॅक्सचे आर.एस.झा, मुक्ता जोशी, सचिन कुलकर्णी, नम्रता दालेरा उपस्थित होते. प्रा. व्ही. पी. गायकवाड यांनी कोऑर्डीनेटर म्हणून काम पाहिले.