Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*सहकार आयुक्त सोबत प्रमाणित लेखापरिक्षकांचा सकारात्मक चर्चासत्र संपन्न*



 *सहकार आयुक्त सोबत प्रमाणित लेखापरिक्षकांचा सकारात्मक चर्चासत्र संपन्न*

प्रतिनिधी /- *रमेशकुमार मिठारे*

  महाराष्ट्र राज्यातील प्रमाणीत लेखापरीक्षक यांना कामकाजात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करणेसाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी बुधवार दिनांक २९ रोजी आढावा बैठक आयोजित केली होती.

     सहकारी लेखापरीक्षक संघ कोल्हापूर, ऑडिटर्स कौन्सिल ॲण्ड वेल्फेअर असोसिएशन तसेच राज्य ऑडिटर्स महासंघ व इतर संघटनांनी केलेल्या पत्रव्यवहार व मागण्यांवर चर्चा करणेसाठी सहनिबंधक राजेश जाधवर साहेब यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित केली होती.

      लेखापरीक्षकांना १० कोटी ठेवींवरील पतसंस्थांचे ऑडिट, परंतुकाच्या लेखापरीक्षण आदेशांतील अनियमितता तसेच लेखापरीक्षण संख्येवरील बंधन यांसह विविध मागण्यांवर सहकार खात्याने अत्यंत सकारात्मक चर्चा केली. बैठकीस सहकार आयुक्त अनिल कवडे,सहनिबंधक राजेश जाधवर, श्रीकृष्ण वाडेकर, रावसाहेब जंगले, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

      लेखापरीक्षकांचे वतीने चर्चा करताना विविध संघटना अध्यक्ष रामदास शिर्के, पोपटराव दसगुडे, श्रीकांत चौगुले,आबासाहेब देशमुख, ए डी माने, उमेश देवकर, अशोक मारणे,  यांचेसह राज्य संघटना ऑडिटर्स कौन्सिल व महासंघ यांच्या विविध पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पन्नास लेखापरीक्षक संघटना प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी कौन्सिल च्या वतीने व इतर सर्व संघटनांसोबत उपस्थित अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.