*पुरात पोहत जाऊन केली पाणीपुरवठ्याची विद्युत मोटर सुरू -ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक*
दत्तवाड -- चार दिवस होत असलेल्या पावसामुळे दत्तवाड येथील पाणीपुरवठा असणारे जॅकवेल पाण्यात गेल्याने व पाणी उपसा मोटर चिखलात अडकल्याने पुरवठा बंद झाला होता ग्रामपंचायत कर्मचारी नाना कासार ,मानतेस पट्टेकरी यांनी दूधगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात पोहत जाऊन आज विद्युत मोटर सुरू केली त्यामुळे नळ पाणीपुरवठा सुरू झाल्याने नाना कासार व मांतेश पट्टेकरी सर्वजण कौतुक करत आहेत.
कोकणासह सर्वत्र पाऊस होत असल्याने दत्तवाड येथील दूधगंगा नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर आली असून गवताची कुरणे , मशान शेड, बुडाले आहे. याबरोबरच दत्तवाड ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा जॅकवेल पाण्यात गेली आहे. त्यामुळे विद्युत मोटर गाळात अडकली होती व पाणीपुरवठा बंद झाला होता हि बाब लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी नाना कासार, मांतेस पट्टेकरी,अमित वसवाडे, सरपंच चंद्रकांत कांबळे अकबर काले, प्रमोद पाटील, सुरज शिंगे यांनी नदीकाठी जाऊन पाहणी केली यानंतर नाना कासार व मांतेश पट्टेकरी यांनी पुरात पोहत जाऊन जॅकवेल ची मोटर सुरू केली यामुळे गाव पाणीपुरवठा सुरू झाल्याने गावातील महिलां वर्गाला दिलासा मिळाला आहे .याबद्दल नाना कासार मांतेश पट्टेकरी याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.