*दत्तवाड येथील पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात*
*दत्तवाड येथील पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात*
दत्तवाड -- सुविचार, सदाचार, सुसंगती व सद्गगुरूचा आशीर्वाद या चार गोष्टी विद्यार्थ्याच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी कारणीभूत असून पालकांनी आपल्या पाल्याला या चार गोष्टीसाठी प्रोत्साहित करावे असे उद्गगार डॉ. कुमार पाटील यांनी काढले ते येथील पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदना व पाद्य पूजा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय तावदारे होते.तर चेअरमन अजित चौगुले प्रमुख उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु व आई-वडिलांचा पाद्यपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी प्रथम आई-वडिलांचा व शाळेतील शिक्षकांच्या पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले. यावेळी डॉक्टर पाटील यांनी जीवनात गुरुचे महत्व, सुसंस्कार व आरोग्य व संस्कृती संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले यावेळी सारिका शिंदे, उदयसिंग मिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रथम स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक अभिजीत मालगावे यांनी केले .तर सूत्रसंचालन प्रियंका वठारे यांनी केले आभार मंदा देशपांडे यांनी मानले. यावेळी सुरेश चव्हाण, पल्लवी गळगे, संजीवनी हेरवाडे, शिक्षकेतर कर्मचारी, माता पिता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
फोटो -दत्तवाड येथील गुरुवंदना कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. कुमार पाटील चेअरमन अजित चौगुले, मुख्याध्यापक अभिजीत मालगावे व इतर मान्यवर