दत्तवाडच्या नेजे हायस्कूलमध्ये अवतरले विठूरायाची पंढरी
दत्तवाड : प्रतिनीधी
दत्तवाड येथील अक्काताई नेजे हायस्कूल व ज्युनि. कॉलेज व पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा या विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांच्या वारकरी वेशभूषेत विठूरायाची पालखी दिंडी मिरवणूक काढण्यात आली .
प्रारंभी माध्यमिक शाळेचे चेअरमन शितल नेजे व प्राथमीक शाळेचे चेअरमन अजीत चौगुले, सदस्य सुकुमार सिदनाळे शाळेचे मुख्याध्यापक संजय तावदारे पर्यवेक्षक एस. बी . मलकाने व नवीन पूर्व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ए. जे. मालगावे आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पालखी पुजन करून दिंडी सोहळ्यास प्रस्थान करण्यात आले. यावेळी विठ्ठल - रुक्मिणीच्या रुपात अवतरलेल्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते . हि दिंडी मिरवणूक मुख्य ग्रामपंचायतींच्या गांधी चौकात आल्या नंतर, वरुण राज्याच्या वारा पावसाच्या खेळात भव्य दिंड्या पताकासह व मृदंगाच्या ठेक्याच्या तालात फुगड्या फेरांच्या खेळात रिंगन सोहळा पार पाडली. यावेळी विठ्ठलाच्या भक्तीत रंगून गेलेली नेजे हायस्कूलची शाळा, दत्तवाडात अवतरले विठूरायाची पंढरीच . असे चित्र यावेळी पहावयास मिळाले. शेवटी आरती करून व प्रसाद वाटप करून या दिंडी सोहळ्यास सांगता करण्यात आली. यासाठी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय तावदारे, सर्व शिक्षकवृंद, उच्चमाध्यमिक विभागाचे ए . एन . मगदूम, डी . बी . खुरपे, के. टी. पाटील व नवीनपूर्व प्राथमीक शाळा विभागाचे मुख्याध्यापक एस जे.मालगावे सर्व शिक्षक व शिक्षकेतर आणि ह. भ. प. बळीराम चव्हाण यांचे सहकारी आदींचे सहकार्य लाभले. या दिंडी सोहळ्यासाठी भक्तीमय भाषेत उत्कृष्टरित्याने आध्यापिका शोभा पाटील यांनी सुत्र संचालन केले .