Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

अलमट्टीधरणाला दत्तवाड समितीची भेट

 



दत्तवाड 

शिरोळ तालुक्यासह इचलकरंजी ,कोल्हापूर, सांगली या भागातील महापूराला कारण असणाऱ्या अलमट्टी धरणाला दत्तवाड येथील माजी सरपंच राजू पाटील, प्रभू चौगुले यांच्या नेतृत्वाखाली समितीने आज रविवार दिनांक 21 रोजी सकाळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी 26 दरवाजे खुले करून सव्वा दोन लाख पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे पाहणीत लक्षात आले.
      गेली आठवडाभर कोकणासह सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पात्रे नद्यांच्या बाहेर आले आहेत वीस पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली गेले आहेत या या पार्श्वभूमीवर महापुराला जबाबदार असलेल्या अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग किती होतो हे पाहण्यासाठी व दोन लाखापेक्षा जास्त विसर्ग करावा या मागणीसाठी दत्तवाड येथील माजी सरपंच राजू पाटील ,  गणेश बँक संचालक व शाहू पतसंस्था दत्तवाड शाखाध्यक्ष प्रभू चौगुले, प्रसिद्ध व्यापारी अनिल कासार, बाळू वठारे ,गजानन रायकर संजय व्हसकल्ले , शाहू पतसंस्थेचे धन्यकुमार बडबडे, विजयकुमार पट्टणकुडे, भरत खाडे यांच्या समितीने  अलमट्टी धरणाला भेट देऊन तेथील अधिकारी मंजुनाथ यांना सूचना केल्या यावेळी धरणाचे 26 दरवाजे खुले केले असून सव्वा दोन लाख क्यूक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. त्यानंतर त्यांनी बॅक वॉटर ला जाऊन दोन दिवसात पाण्याची पातळी पंधरा फुटा ने कमी आल्याचे पाहिले यामुळे अलमट्टीतून विसर्ग सुरू असल्याने महापुराचा धोका टळला असल्याचे मत प्रभू चौगुले यांनी व्यक्त केले आहे.