*टाकळीवाडी येथील दोन्ही सख्ख्या बहिणींची ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया या देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी निवड*
*टाकळीवाडी येथील दोन्ही सख्ख्या बहिणींची ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया या देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी निवड*
टाकळीवाडी प्रतिनिधी
टाकळीवाडी ता. शिरोळ येथील माजी सैनिक तसेच वी वी आय पी सुरक्षा दलात कार्य केलेले सूर्यकांत बदामे यांची दोन्ही कन्या यांची परदेशात शिक्षणासाठी निवड झाली आहे.
कुमारी प्रतीक्षा सूर्यकांत बदामे हिची एम.एस. इन डाटा सायन्स मोनाश युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी निवड झाली आहे.
तसेच कुमारी प्रगति सूर्यकांत बदामे हिची कॅम्पुटर सायन्स डिग्री शेजाग युनिव्हर्सिटी साऊथ कोरिया येथे निवड झाली आहे.
सख्ख्या बहिणींची एकाच वेळी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
या दोघी बहिणींचा सत्कार सैनिक वेल्फर असोसिएशन टाकळीवाडी गावातील सर्व आजी-माजी सैनिक यांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
