Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*स्मार्ट चॅम्पस् चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात*



 *स्मार्ट चॅम्पस् चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात*

स्मार्ट चॅम्पस् इंग्लिश स्कूल सैनिक टाकळी आणि कुरुंदवाड च्या दोन्ही शाखेचे वार्षिक स्नेह-संमेलन एकत्र उत्साहात संपन्न झाले. सैनिक टाकळी च्या प्रिंसिपल सौ.स्वप्नाली पाटील यांनी कार्यक्रमा चे स्वागत आणि मागील आठ वर्षाचा शाळेचा आढावा देऊन केला. कुरुंदवाड शाखेच्या प्रिन्सिपल सौ.अमृता माळी यांनी शाळेची सद्यस्थिती आणि प्रगतीची माहिती दिली.

दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांकडून इंग्रजी, हिंदी, मराठी मधील नृत्य, नाटिका, भाषणे तसेच विनोदी ॲक्ट अशी भरगच्च सांस्कृतिक कलाविष्कारांची मेजवानी या विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये पाहण्यास मिळाली. 

         सुप्रसिद्ध उद्योजक, ब्रह्मा ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन मा.श्री.मारुती माळी, स्वामी विवेकानंद ग्रुप एज्युकेशनचे संस्थापक चेअरमन मा.श्री.राजकुमार शिनगारे, सौ. प्रेमाला शिनगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन गौरव करण्यात आले, तसेच आदर्श पालकांचाही मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

            स्मार्ट चॅम्पस् स्कूल दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहे. क्रीडो आणि लिड शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत या स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अगदी लहान वयात बुद्धिमत्ता विकास होऊन त्यांची शैक्षणिक प्रगती झालेली दिसून येते असे उद्गार संस्थेचे चेअरमन मा.श्री.विजयकुमार गवंडी सर यांनी काढले.  त्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.

       या कार्यक्रमासाठी संस्थेच्या व्हा. चेअरमन सौ राजश्री गवंडी, संस्थेचे हितचिंतक मा.श्री.संतोष पाटील सर , मा.बुद्धीराज खुरपे, प्रा.नितीन माळी, अजित पाटील, संजीव पाटील, विनोद पाटील, सुधीर पुजारी, डॉ.संदीप कोळी, सचिन पाटील, पत्रकार आणि   पालक वर्ग उपस्थित होता. 

.नितीन कोरे सरांनी  आभार मानले.