Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्ती नंतरही दिली वृत्तपत्र विद्या पदवी परीक्षा. रमेश शंकर कोळी यांचे यश कौतुकास्पद.



 सेवानिवृत्ती नंतरही दिली वृत्तपत्र विद्या पदवी परीक्षा.

रमेश शंकर कोळी यांचे यश कौतुकास्पद.

दत्तवाड: प्रतिनिधी : शिक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे.शिक्षणाला वयाची अट नसते.कोणत्याही वेळी, केंव्हाही शिक्षण घेता येते.त्यासाठी हवी असते फक्त इच्छाशक्ती.मानव इच्छा शक्तीने सर्व काही इप्सित साध्य करू शकतो.हे प्रत्यक्षात दाखवून दिलय शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावचे सुपुत्र रमेश शंकर कोळी यांनी.

        कन्या विद्या मंदिर घोसरवाडचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक,कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळ कोल्हापूर चे सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या रमेश कोळी यांनी वृत्तपत्र विद्या पदवी अर्थात मास कम्युनिकेशन जर्नालिझम (एमसीजे) करण्याची इच्छा दिलीप शिरढोणे यांच्या जवळ प्रगट केली.त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक च्या नाईट कॉलेज इचलकरंजी येथील अभ्यास केंद्रावर प्रवेश घेतला.तेथील प्राचार्य डॉ.विरूपाक्ष खानाज,केंद्र संचालक डॉ.रामेश्वर संकपाळ, प्रा.एफ.एन.पटेल,स्वतः दिव्यांग असूनही इतरांना सदोदित सहकार्य करणारे लिपिक सतिश महाकाळे,प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन स्टाफ,कुटुंबिय यांचे सोबतच सहकारी मित्र मेहबूब मुजावर, डॉ.दिपिका कोकरे,दिलीप शिरढोणे यांचे सहकार्य लाभले.

          मे- जून २०२५ मध्ये झालेल्या प्रथम वर्ष परीक्षेत ६००पैकी३७८गुण (६३टक्के) मिळवून उत्तीर्ण झाले. त्यांच्या या जिद्दीचे व यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.