नवीन पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा,दत्तवाड.मध्ये गुरुपौर्णिमेचे अवचित साधून विध्यार्थ्यांकडून पालकांचे पाद्यपूजन
दत्तवाड दि १०:नवीन पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा दत्तवाड येथे गुरुपौर्णिमेचे अवचित साधून विद्यार्थ्यांकडून पालकांचे पाद्यपूजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. आई वडील हे आपले प्रथम गुरु त्यांच्यापासूनच आपले अस्तित्व सुरू ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दृढ होण्याच्या दृष्टीने तसेच अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे गुरुवर्य यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने संस्काराची बीजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्याच्या हेतूने पाद्यपूजन कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा समितीचे चेअरमन . अजित चारित्र्य चौगुले होते तर प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध लेखक मनोहर महादेव भोसले होते. त्यांनी अतिशय उत्तम अशा पद्धतीने पालकांचे प्रबोधन केले व शाळेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
.स्वागत व प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अभिजीत मालगावे केले तर आभार सौ गळगे मानी मानले सूत्रसंचालन सौ देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमास पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

