बहुगुणी जायफळ
बहुगुणी जायफळ(Nutmeg)
1)वांग व डाग -जायफळ, आंबेहळद, हरभरा पीठ समभाग घेऊन, रात्रीच्या वेळी पाण्यात मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील सर्व डाग, वांग जाण्यास मदत होते.
2)मोड्या -जायफळ दुधात मिसळून लेप केल्यास नाहीसे होतात.
3)संडास वाढणे(अतिसार )-जायफळ तुपात उगाळून दिल्यास लहान मुलांचे संडास थांबते.
4)डोकेदुखी -जायफळ, वेखंड, सुंठ यांचा एकत्रित लेप, कपाळावर लावल्यास, डोकेदुखी थांबते.
5)अनिद्रा -जायफळ, आस्कंद एकत्रित रात्री झोपताना, दुधातून घेतल्यास, शांत झोप लागते.
6)सांधेदुखी -जायफळ तिळाच्या तेलात मिसळून, गरम करून चोळावे, सांधेदुखी थांबते.
7)वाजीकरण(वीर्यस्तंभनास)-
जायफळ, अश्वगंधा, सफेद मुशली, कवाजबीज एकत्रित दुधासोबत घेतल्यास चांगला फायदा होतो.
डॉ. ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
9175723404,7028612340