*एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रमांतर्गत गुरूदत्त शुगर्स कडून अकिवाट ग्रामपंचायतीस ३००० डस्टबिन चे वाटप*
*एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रमांतर्गत गुरूदत्त शुगर्स कडून अकिवाट ग्रामपंचायतीस ३००० डस्टबिन चे वाटप*
प्रतिनिधी -- रमेशकुमार मिठारे अकिवाट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा प्रभावाने गुरुदत्त शुगर्सने एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रमास सुरूवात केली आहे.महापुर,कोरोना, अगर लंम्पी सारखा रोग असो गुरुदत्त शुगर्सने नेहमीच या सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलून माणुसकी जपली आहे.यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरूनये हे लक्षात घेऊन अकिवाट ग्रामपंचायतीस ३००० डस्टबीन वाटप करणेचा निर्णय घेतला आहे.असे मत गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी डस्टबिन वाटप करताना व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच प्रकाश रायनाडे यांनी घाटगे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.डस्टबिन वाटपामुळे गुरुदत्त शुगर्स व घाटगे परिवाराचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
यावेळी १५ वा वित्त आयोग सन २०२२-२०२३ च्या योजनेतून घंटा गाडीचे लोकार्पण सोहळा घाटगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास सरपंच वंदना पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य-इकबाल बैरगदार, सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील,ताजुद्दीन तहसिलदार, रावसाहेब नाईक, आप्पासाहेब बडबडे, जेष्ठ पत्रकार गणपती कागे, साप्ताहिक दलितमित्रचे संपादक-विश्वास कांबळे, आप्पासाहेब म्हैशाळे,अनिल वळवाडे,अनिल उगारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गुरुदत्त शुगर्स अकिवाट गावचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.