Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

बहुगुणी लसूण (Garlic )

 

बहुगुणी लसूण (Garlic )

गुणधर्म -तिकट, तीक्ष्ण, उष्ण, वातनाशक, पित्तवर्धक, वीर्यवर्धक, धातूपुष्टीकारक.

औषधी उपयोग -

1)वाजीकरण/काम शक्ती वाढण्यासाठी 

2)हृदय विकारामध्ये, कोलेस्टे्रोल नाहीसे करते.

3)गॅसेस पासून मुक्ती

4)कर्ण शूलामध्ये(कान दुखी )-याचा 2थेंब रस कानात टाकल्यास तात्काळ आराम मिळतो

5)क्षयरोग, निमोनिया-यामध्ये कच्चे 2लसूण ग्रहण करावे 

6)दातदुखी -यामध्ये लसनाचे तेल कापसामध्ये घालून, दातामध्ये धरून ठेवल्यास ती ठणक कमी होते

7)वात विकारात (कंबरदुखी,मानदुखी, गुडघा दुखी, लकवा यामध्ये खालील प्रमाणे लसणाचा प्रयोग करावा.

लसूण पोटातून घेण्याची कृती -

1ग्लास एवढ्या दुधामध्ये 10 लसूण पाकळ्या घालून ते दूध उकळावे, उकळून झाल्यावर ते दूध गाळून घ्यावे, गाळून झाल्यावर त्या दुधामध्ये 2चमचे तूप घालावे व घ्यावे. वात विकार या कृतीने कमी होतात.

लसूण बाह्य उपचारासाठी (स्थानिक चिकित्सा)10पाकळ्या लसूण 100ml खोबरेल तेलात तळाव्या व ते तेल जो भाग /अंग दुखतेय त्या भागावर चोळावे याने गुडघादुखी, लकवा, कंबरदुखी /कसलेही दुखणे थांबते.

डॉ. ओंकार अशोक निंगनुरे.

कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.

9175723404,7028612340