मूळव्याध (अर्श ) कारणे व आयुर्वेदिक उपाय
मूळव्याध (अर्श ) कारणे व आयुर्वेदिक उपाय
हा सामान्यता: आढळणारा आजार आहे. घरटी एकातरी व्यक्तीला हा आजार आढळतो. याचे मुख्य कारण आहे "उष्णता व "मलबद्धता "
कारणे -
तिकट -मसालेदार पदार्थ्यांचे सेवन, जागरण, शोक, मालवरोध, मद्यपान.
लक्षणे -
संडास करतेवेळी रक्त पडणे, दुखणे, भगभगणे, सूज येणे, मोड बाहेर येणे, त्रास होणे.
औषध -अभयारिष्ट, परिपाठादी काढा, त्रिफळा चूर्ण.
उपाय -
1)झोपतेवेळी 1चमचा एरंडेल तेल,1ग्लास दुधातून घेणे.
2)सलाड चा वापर (काकडी, बिट, गाजर )
3)ताक, लोणी, तूप, सफरचंद, लिंबू, आंबील, मनुके यांचे सेवन.
4)हरितकी, पर्पटक, यष्टीमधू, सारिवा या सर्वांचे चूर्ण एकत्र करून 2चमचे, दिवसातून 2वेळा, कोमट पाण्यातून घेतल्यास तात्काळ आराम मिळतो.
अपथ्य (काय खाऊ नये )-
शेंगदाणे, वाळलेले खोबरे, ग्रेव्ही, खर्डा, मिरची, दही, चहा, काळे मिरे, लवंग, मोहरी, तिळ, काजू, पोहे, आळू, गवारी, गव्हाचे अन्न.
डॉ. ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसारवाड.
9175723404,7028612340