*दतवाड तंटामुक्त अध्यक्षांचा राजीनामा*
*दतवाड म. गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षांचा राजीनामा*
*सर्वांना संधी मिळाली पाहिजे....तंटामुक्त समिती अध्यक्ष अँड. श्री सुरेश पाटील , (दत्तवाडकर)*
दत्तवाड -येथील तंटामुक्ती अध्यक्ष अँड सुरेश पाटील दतवाडकर यांनी आपल्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने पदाचा राजीनामा सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला.
त्यांनी आपण एका वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेऊन आपल्याला तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केलेल्या व वर्षभर सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले इथून पुढेही आपण सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारा असून तंटामुक्त समितीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले याबरोबरच गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना व राजकीय विचारसरणीच्या लोकांना एकत्र घेऊन सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी ए सी पाटील ,ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील ,देवराज पाटील, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, अमित माने, भाऊसो चौगुले, कुमार पाटील, तेजस वराळे ,शामराव बिरणगे,युवराज माने, उपस्थित होते.