Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

बांबरवाडी,दत्तवाड शाळेचे कार्य उत्कृष्ट पट वाढविण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे -सरपंच चंद्रकांत कांबळे

जे डी न्यूज नेटवर्क दत्तवाड मंदा देशपांडे



   दत्तवाड. विद्या मंदिर बांबरवाडी शाळेचे कार्य उत्कृष्ट  आहे. पालकांनी शाळा टिकविण्यासाठी पट वाढविणे आवश्यक आहे त्यामुळे पालकांनी शाळेला सहकार्य केले पाहिजे.असे आवाहन दत्तवाडचे सरपंच चंद्रकांत कांबळे सर यांनी केले आहे.

       ते पुढे म्हणाले -शाळेचा पट कमी असूनही सर्व प्रकारचे उपक्रम शाळेत चांगल्या प्रकारे राबविले जातात. शाळेचे स्नेहसंमेलन बंदिस्त हॉलमध्ये न घेता खुल्या स्टेजवर घेण्याचे धाडस दाखविले आहे.

          विद्या मंदिर बांबरवाडी, दत्तवाड शाळेच्या व अंगणवाडी बांबरवाडीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना सरपंच चंद्रकांत कांबळे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य बाबुराव पोवार, ग्रामपंचायत सदस्या सीमा प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता पाटील,उपाध्यक्षाअर्चना चव्हाण, सदस्य -दिलीपकुमार कुरुंदवाडे,कोमल चव्हाण, नामदेव चव्हाण,शंकर मटाले संतोष औंधकर,राजू जुगळे, संजय निकम, सुभाष कुरुंदवाडे,काका पुजारी,दशरथ जबडे,राजू मुगळे,रजनीगंधा पुजारी,शुभांगी उरुणकर, बाजीराव पाटील,दिलीप राऊ चव्हाण यांचेसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

         वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी माजी उपसरपंच दिलीप दत्तू चव्हाण यांचे बहुमोल सहकार्य लाभले. उपस्थितांना हॉटेल आयुष चे मालक निलेश चव्हाण यांनी गणेश जयंतीचे औचित्य साधून स्नेहभोजन दिले.

         श्रृतिका रमेश चव्हाण हिने कोरिओग्राफीसाठी विशेष योगदान दिले.अंगणवाडी सेविका रेखा चव्हाण यांनी ही अंगणवाडीतील चिमुकल्यांना सहभागासाठी प्रोत्साहित केले.रमेश चव्हाण,ओंकार धोंड,दत्तात्रय धोंड,श्रेयश चव्हाण,तेजस चव्हाण,प्रशांत चव्हाण यांचेसह निर्झर कला क्रीडा मंडळ बांबरवाडी,दत्तवाडचे सहकार्य लाभले.

       स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी केले तर आभार सरिता राजमाने यांनी मानले.