Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दूधगंगेतून एक थेंबही पाणी न देण्याचा पुनरुच्चार..

 दूधगंगा नदी काठात दुफळी पाडण्याचा डाव हाणून पाडू -   दूधगंगा बचाव कृती समिती

१७ फेब्रुवारी च्या पाणी परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार..

दतवाड :  सौ मंदा  देशपांडे 


 सुळकूड येथून इचलकरंजी साठी मंजूर झालेल्या अमृत योजनेला वाढता विरोध पाहता लोकप्रतिनिधींनी याला इतर विविध पर्यायाची चाचपणी सुरू करून दूध गंगा नदी काठात दुफळी निर्माण करण्याचा जो डाव रचला आहे तो कदापि यशस्वी होऊ देणार नाही. असा इशारा दत्तवाड (ता. शिरोळ) येथे आयोजित बैठकीत दूधगंगा बचाव  कृती समितीच्या वतीने देण्यात आला. १७ फेब्रुवारीला सुळकुड येथील दूधगंगा नदीच्या धरणावर होणाऱ्या पाणी परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत दूधंगेतून इचलकरंजीला एक थेंबही पाणी न देण्याचा पुनरुच्चार करण्यात आला. सदर बैठकीस दतवाड सह सुळकुड , सांगाव चे प्रतिनिधी ही उपस्थित होते.

       याप्रसंगी बोलताना भाजप तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील म्हणाले की, काही वर्षांपूर्वी खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदी पात्रात उतरून प्रदूषण दूर करण्यासंदर्भात आंदोलन केले होते. आता त्यांना कदाचित त्याचा विसर पडला आहे. देशातील पंचगंगेपेक्षा अधिक प्रदूषित नद्या योग्य उपाय योजनेद्वारे शुद्ध होऊ शकतात तर पंचगंगा का नाही? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

         तर सुळकुडचे अमोल शिवई म्हणाले की, योजनेला आमचा विरोध दूर करण्यासाठी आम्हाला अनेक प्रस्ताव देण्यात आले. मात्र आमच्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाची डाळ शिजली नाही, त्यामुळे ते सुळकुडच्या खालील गावात चाचपणी करीत आहेत. मात्र त्यांनी लक्षात ठेवावे दूधगंगा नदीकाठ एकसंध असून कोणत्याही परिस्थितीत ही योजना यशस्वी होऊ देणार नाही.

           याप्रसंगी ग्रा.पं. सदस ्य संजय पाटील म्हणाले की, दूधगंगा नदीवरील काळमवाडी धरणाकरिता कागल, राधानगरी, भुदरगड, शिरोळ, कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दान दिल्या. या पाण्यावर प्रकल्पग्रस्त लोकांचा पहिला अधिकार आहे. या प्रकल्पातील पाण्यातून अजून पूर्ण सिंचन झालेले नाही तरीही प्रशासन दूध गंगेचे पाणी लाभ क्षेत्रात नसणाऱ्या इचलकरंजी महानगरपालिकेला घेऊन जात आहे. हा दुध गंगा नदी काठावर अन्याय आहे व तो कदापि सहन केला जाणार नाही.

           याप्रसंगी सरपंच चंद्रकांत कांबळे, ग्रा.पं. सदस्य बाबुराव पवार, संजय पाटील, देवराज पाटील, डी एन सिदनाळे, एन एस पाटील, ए सी पाटील, ए ए पाटील,  आनंदा जाधव, मिलिंद देशपांडे,आधी सह सुळकुडचे उपसरपंच शरद धुळुगडे, युवराज पाटील, अमोल शिवई, कसबा सांगाव चे मनोज कोडोले, रोहित व्हटकर, आधीसह दतवाड व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मक्तेदारांना नदीकाठच्या रोशाला सामोरे जावे लागणार...

      दूधगंगा नदी काठाचा अमृत योजनेला तीव्र विरोध असतानाही काही मक्तेदारांनी लोभास बळी पडून निविदा भरले आहेत. मात्र त्यांना दूधगंगा नदी काठच्या रोशाला सामोरे जावे लागणार याचे त्यांनी भान ठेवावे....

                              दूधगंगा बचाव कृती समित