Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

ब्रम्हनाथ देवाची यात्रा मंगळवार ते शनिवार अखेर

   दानवाड-


जुने दानवाड हे महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर दुधगंगा नदिच्या काठावर वसलेले असुन जागृत देवस्थान ग्रामदैवत ब्रम्हनाथ देवाची भव्य यात्रा मंगळवार ते शनिवार अखेर संपन्न होणार आहे.

या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २१ रोजी सकाळी ९ वाजता अभिषेक व पुजा संध्याकाळी जीवधंर सुर्यवंशी दतवाड व सहकारी यांचा मलखांब व क्रीडा कार्यक्रम , संध्याकाळी ७ वाजता हिपनॉटिझमचा कार्यक्रम व रात्री १० वाजता संगीत भजनांचा कार्यक्रम बुधवारी दि २२ मुख्य यात्रेचा दिवस सकाळी ६ वाजता ध्वजारोहण व सकाळी ७  वाजता पालखी मिरवणूक वाद्दासह काढण्यात येणार व रात्री ८ वाजता भव्य आतिषबाजी कार्यक्रम, गुरुवारी २३ रोजी दुपारी २ वाजता रिव्हर्स रिक्षा स्पर्धा, व भव्य हाप पिच क्रिकेट स्पर्धा,फायनल सामना ७ वाजता

शुक्रवार २४ रोजी सकाळी ११ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम,व सायंकाळी ४ वाजता भव्य हलगी स्पर्धा, शनिवारी २५ रोजी रात्री ९ वाजता  शेखर कलगी दतवाड यांचा ऑर्केस्ट्रा सरगम बिट्स दि मेलडी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री ब्रम्हनाथ यात्रा कमिटी , नवे व जुने दानवाड ता, शिरोळ सरपंच, उपसरपंच नवे व जुने दानवाड ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील , सर्व विकास सेवा संस्था,दुध संघ, व्यापारी, पतसंस्था, बॅंका, सर्व कलाक्रिडा मंडळे, गणेशोत्सव मंडळे,तरून मंडळे व यात्रा कमिटी यांच्या सहकार्याने ही यात्रा संपन्न होत आहे.