कोपेश्वर मंदिर परिसरातील विविध कामांसाठी ३ कोटी ४६ लाखाचा निधी - राजेंद्र पाटील यड्रावकर
खिद्रापूर येथील बाराव्या शतकातील शिलाहार काळातील पुरातन कोपेश्वर मंदिर परिसरातील विविध कामांसाठी ३ कोटी ४६ लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार असून मिळालेल्या या निधीमुळे शिरोळ तालुक्याचे वैभव असणाऱ्या खिद्रापूर या पर्यटन स्थळी विविध विकास कामे केली जाणार आहेत, त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सेवा सुविधा उपलब्ध होतील असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटले आहे, निधी मंजूर केल्या बद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा व राज्य मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत, खिद्रापूर साठी मंजूर झालेल्या ३ कोटी ४६ रुपयांच्या निधीमधून रुपये ८८ लाख वाहनतळ उभारण्यासाठी,८९ लाख कोपेश्वर मंदिर नदी घाट व परिसर सुधारण्यासाठी,८६ लाख कोपेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता सुधारण्यासाठी ७३ लाख रुपये कोपेश्वर मंदिर स्वागत कमान व रस्ता सुधारण्यासाठी तर १० लाख रुपये स्वच्छतागृह उभारण्यासाठी मंजूर झाले असून या निधीचा विनियोग वरील कामांसाठी केला जाणार आहे, खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी पर्यटन विभागाच्या वतीने मंजुरी बाबतचा शासन निर्णय २९ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे,या सर्व कामांचे इस्टिमेट पूर्ण झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.