टाकळवाडी येथील सेवानिवृत्त ऑडनरी कॅप्टन रमेश रावजी निर्मळे यांचा आज पन्नासावा वाढदिवस
टाकळवाडी येथील सेवानिवृत्त ऑडनरी कॅप्टन रमेश रावजी निर्मळे यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे.
टाकळवाडी या लहानशा गावात जन्म घेऊन त्यांनी देशसेवा करण्याचे स्वप्न पाहिले या स्वप्नांसाठीच त्यांनी मेहनत करून भारतीय सेनेच्या परीक्षा यशस्वी पास होऊन 30 ऑक्टोंबर 91 रोजी भारतीय सेनेत रुजू झाले सागर मध्यप्रदेश येथे ट्रेनिंग पास करून त्यांनी पहिली पोस्ट जम्मू-काश्मीर येथे केली, त्यानंतर पाच वेळा जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तान बॉर्डर वरती देशसेवा केली तसेच जम्मू-काश्मीर चायना बॉर्डर येते फर्स्ट गलिसियेर मध्ये सर्विस केली परदेशामध्ये भूतान व साउथ आफ्रिका सुडान येथे शांती सेना म्हणुन देशाचे नाव उज्वल केले आहे याबरोबरच राजस्थान ,बेंगलोर, जामनगर ,येथे येथे आपली सेवा बजावून शेवटी उत्तराखंड येथून 28 वर्ष सेवा करून ऑनरेरी कॅप्टन पदावरून सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण या समाजाचे काही देणे लागतो ही भावना ठेवून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी गावात सुरू केले आहेत गावातील मराठी शाळेला विविध उपक्रमात सामील करून तेथील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली आहे देशसेवा समाजसेवा करणाऱ्या टाकळीवाडीच्या या सुपुत्राचा आज पन्नासावा वाढदिवस असून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा