Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

विकास कामांपासून शिरोळ तालुक्यातील कोणतेही गाव वंचित राहणार नाही*

 *विकास कामांपासून शिरोळ तालुक्यातील कोणतेही गाव वंचित राहणार नाही*

*आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर*

*मजरेवाडी,अकिवाट, राजापूर व राजापूरवाडीत १५ कोटी ४३ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ*



  शिरोळ तालुक्याच्या विकास कामांसाठी आणता आला या पुढच्या काळात देखील निधी आणण्याचा वेग कायम राहील त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कोणतेही गाव विकास कामांपासून वंचित राहणार नाही असे उदगार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले, तालुक्यातील मजरेवाडी, अकिवाट, राजापूर व राजापूरवाडी या गावांमधील १५ कोटी ४३ लाखांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व शुभारंभ शनिवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राजापूर येथे ते बोलत होते, शिरोळ तालुक्यातील सर्वच गावांना मी कोणताही भेदभाव न करता गट तट अथवा पक्ष भेद न मानता सातत्याने निधी दिला आहे, विकास कामात राजकारण आणू नये ही माझी नेहमीची भूमिका आहे, विकास कामासाठी गट-तट विसरून सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे  असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यावेळी म्हणाले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून राजापूर येथे  ४ कोटी १४ लाख ५१ हजार रुपयांच्या मंजूर निधी मधील काही  विकास कामांचा शुभारंभ संपन्न झाला, मजरेवाडी येथे ३ कोटी ४३ लाख ७६ हजार रुपये, अकीवाट येथे ६ २६ लाख ५५ हजार, तर राजापूरवाडी गावासाठी १ कोटी ५८ लाख ५५ हजार रुपये इतका निधी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे यातील काही विकास कामांचा शुभारंभ आणि काही कामांचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला, राजापूर येथे शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक रविकांत कारदगे, अरुण मगदूम, अल्ताफ जमादार, इराप्पा हिंगमिरे, संजय पाटील, गुरुपाद कुंभार, इकबाल दानवाडे, मौला पटेल, ग्रामपंचायत सदस्य सागर अंकलखोपे, आकाश पाटील, प्रकाश हिंगमिरे, नवाज खोदू, सुरेश कांबळे, माणिक जाधव, मुरली सुतार, लकाब खोदू, हसन जंगले, मलगोंडा पाटील, इमाम पटेल, रमेश पाटील, एम.डी. कुंभार, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, मजरेवाडी येथे शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती भालचंद्र कागले, शरद साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण चौगुले, सरपंच संगीता परीट, उपसरपंच अंकिता चव्हाण, बापूसाहेब पटवर्धन सरकार,आण्णाप्पा दत्तवाडे, शिवराया गवंडी, विद्यासागर बस्तवाडे, दिनकर नरुटे, अभिजीत दतवाडे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, अकिवाट येथे सरपंच वंदना पाटील, उपसरपंच रत्ना सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरागदार, बाळासाहेब नाईक, ताजुद्दीन तहसीलदार, विशाल आवटी, श्रेणिक चौगुले, रावसाहेब नाईक, आप्पासाहेब बडबडे, राजाराम कल्लणावर बाळासो उमाजे, आप्पासो दानोळे, प्रदीप पाटील, अनिल पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, राजापूरवाडी येथे सरपंच रावसाहेब कोळी, उपसरपंच अभिजीत कोळी, पांडुरंग गोते, राजू गोते, प्रदीप कोळी, यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.