Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड येथे महाराजस्व अभियानचे आयोजन

 दत्तवाड. - 


-शिरोळ तहसीलदार कार्यालयामार्फत व दत्तवाड मंडलाधिकारी यांच्या संयोगाने राज्य सरकारच्या महाराजस्व अभियान चे  आयोजन करण्यात आले होते  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशिक्षणार्थ तहसीलदार  विकास बिक्कड होते.

        दतवाड मंडल अंतर्गत. येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहामध्ये घोसरवाड, दत्तवाड, टाकळीवाडी ,टाकळी ,राजापूर ,राजापूर वाडी, नवे जुने दानवाड, खिद्रापूर येथील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने राज्य सरकारच्या महसूल विभागाने सुरू केलेल्या  महा राजस्व अभियान  आज उत्साहात पार पडले. यावेळी नागरिकांना  पोस्ट ऑफिस, महावितरण पशुसंवर्धन आरोग्य विभाग पुरवठा विभाग ग्रामपंचायत या विभागातील विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले तर महा-ई-सेवा अंतर्गत आधार कार्ड दुरुस्ती नवीन काढणे या सुविधा देण्यात आल्या.

      यावेळी प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या विभागात चालणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली.

प्रथम स्वागत व प्रास्ताविक मंडल अधिकारी विनायक माने यांनी केले तर प्रशिक्षणार्थ तहसीलदार बेलेकर यांनी राज्य सरकारच्या या अभियानाची माहिती सांगून नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान केले.

       यावेळी माजी सभापती दिपाली परीट,  राजापूरवाडीचे सरपंच कोळी, पशुसंवर्धन चे डॉ कुरुंदवाडे, पोस्ट ऑफिस  चे महावीर तराळ   कुरुंदवाड एसटी डेपो चे विनायक गवळी, आरोग्य विभागाचे दिलीप आटपाडे महावितरण चे रवींद्र पाटील, दत्तवाड तलाठी इकबाल मुजावर, राजापूरचे जयसिंग चौगुले टाकळीचे महेश साळवी शामराव पाटील ग्रामसेवक संतोष चव्हाण, कोतवाल राम शिंदे दीपक गस्ते संजय कोळी, संगणक ऑपरेटर विनायक रजपूत सिद्ध भमाने दत्ता पोवार, सुरेश बिरंगे    सर्व गावचे ग्रामसेवक,  पोलीस पाटील , दत्तवाड, सैनिक टाकळी येथील महा ई सेवा केंद्राचे संचालक, विविध विभागाचे प्रमुख लाभार्थी नागरिक ,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.