शिरोळ तालुका मराठा महामेळावा घेण्याचा निर्णय
कुरूदवाड -
येथे मराठा समाजाची बैठक पार पडली यामध्ये शिरोळ तालुका मराठा महामेळावा घेण्याचे सर्वानुमते ठरले आजची जी आरक्षणाची परिस्थिती आहे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा जिल्ह्याच्या ठिकाणाची वस्तीगृहाची मागणी असेल तसेच आपल्या सर्व समाजातील विद्यार्थ्यांना तरुणांना रोजगार मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन योग्य प्रकारे मिळाले पाहिजे यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येणे गरजेचे आहे.
मरेन पण मागे हटणार नाही म्हणजे मराठा महाराष्ट्राच्या मातीत जो इतिहास घडला आहे तो मराठ्यांनी आपल्या रक्तांनी घडविलेला आहे आज आपल्या समाजाला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे मुलांचे शिक्षणासाठी वस्तीग्रह चा प्रश्न आहे त्यांना लागणारे आर्थिक नियोजनाची तरतूद शासनाकडून होणारा मदत तुटपुंजी पडत आहे शेती एकरावरून गुंठेवारी झालेली आहे लाखो लोकांना पोसणारा आपला हा मराठा समाज कधी स्वतः उपाशी राहायला लागला हेच कळेना झालं आरक्षणाचा प्रश्न तर महत्त्वाचा आहेच पण त्याचबरोबर कित्येक प्रश्न आहेत यासाठी आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे आपल्या मुलांना शिक्षण व व्यवसाय प्रशिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच त्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे राहण्यासाठी जिल्ह्यात वस्तीग्रहांचे उभारणी करणे या जर गोष्टी करून घ्यायचे असतील तर आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे अन्यथा आपली भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक घालून तेथील माती व जल कलश भरून घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये असलेल्या मराठा समाजापर्यंत जाऊन त्याचे त्यांना दर्शन घडवून एकत्र येण्याची शपथ घेण्याची ठरले असल्याची माहिती शिरोळ तालुका मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष नंदकुमार नाईक यांनी दिली.या कार्यक्रमांसाठी महिपती बाबर अभिजीत जगदाळे विजय माने सुधाकर पाटील (शेती अधिकारी) नंदकुमार पाटील शिवाजी लोंढे युवराज घोरपडे तानाजी गोरे सुरज भोसले ऋतुराज संकपाळ माने मान्यवर उपस्थित होते.