Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

टाकळीवाडी मधील जागृत देवस्थान श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य धनगरी ढोल वादन स्पर्धा,

 टाकळीवाडी मधील जागृत देवस्थान श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य धनगरी ढोल वादन स्पर्धा,


पत्रकार नामदेव निर्मळे

  टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जागृत देवस्थान श्री म्हसोबा यात्रेनिमित्त भव्य धनगरी ढोल वादन स्पर्धा श्री लक्ष्मी म्हसोबा वालुग मंडळ  यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

    शनिवार दि.२९/०४/ २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजता पालखीचे भव्य मिरवणूक व रात्री ०९.०० वाजता ढोल वादन स्पर्धा आयोजित केले आहेत.

 रविवार दि. ३०/०४/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

   १ क्रमांक  रु १०.००१/- सूर्यकांत मलकारी बदामे (साहेब) यांचेकडून व श्री फकीर नागराल यांचेकडून कायमची ढाल,२ क्रमांक ७.००१/- राजेश अण्णाप्पा खोत (फौजी) व भरत तानाजी खोत (फौजी) व स्वराज अवधूत खोत यांचे कडून व बाजीराव कुडग यांचे कडून कायमची ढाल, ३ क्रमांक ५००१/- मोहन पुजारी, राजू परशुराम कोळी यांचेकडून व सुरेश गुडसे यांचे कडून कायमची ढाल,४ क्रमांक ३००१/-सुदर्शन शिरगुपे ( माजी सैनिक),विजय निर्मळे, सतीश पाटील, मेहबूब शेडुरे यांच्याकडून कायमची ढाल ५ क्रमांक २००१/- प्रमोद खोत, तुकाराम बाबुराव खोत यांचेकडून व सुभाष बाबु खोत यांच्याकडून कायमची ढाल असे बक्षिसाचे स्वरूप आहे.

*आधारस्तंभ अनिल शंकर खोत (फौजी) व मंगराया हक्के यांच्याकडून भंडारा स्पर्धेसाठी दिला. *विशेष देणगीदार* राकेश पाटील ,अरुण पाटील, रतन बाबासो खोत, शरद सलगरे, बजरंग कोळी, सुकुमार भाले, नेताजी खोत, पोपट खोत, प्रशांत खोत, संजय उन्हाळे, रमेश चिगरे यांचे मोलाचे योगदान लाभले.

  या स्पर्धा होळकर चौक येथे होतील. पुजारी मनोहर खोत यांनी जास्तीत जास्त स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.