परिवर्तन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे एन एम एम एस परीक्षेत उज्वल यश , अनुष्का पाटील जिल्ह्यात दहावी
दत्तवाड --
येथील परिवर्तन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून अनुष्का देवराज पाटील ही जिल्ह्यात दहावी आली आहे तर एकूण आठ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे.
दत्तवाड ता. शिरोळ येथील परिवर्तन प्राथमिक शाळेने यावर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या एन एम एम एस या परीक्षेत आठ विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. अनुष्का देवराज पाटील, हबीब जमीर भरकाटे , ज्ञानेश्वरी राजेंद्र कोरवी, रवीना राजेंद्र तिप्पनावर, तनुश्री शितल आलते अनुष्का राजेंद्र तिप्पानावर, विश्वजीत विवेक चौगुले निर्जरा संजय तिप्पानावर यांनी यश संपादन केले आहे
शाळेचे आजपर्यंत ३४ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. यशस्वी प्रत्येक विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये प्रमाणे पुढील चार वर्षे अशी एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. शाळेने यावर्षी एकूण ३ लाख ८४ हजार इतकी शिष्यवृत्ती मिळवली आहे.
त्यांना संस्थेचे सचिव बबनराव चौगुले यांनी प्रोत्साहन दिले असून मुख्याध्यापक बी बी खोत, शिक्षक पी व्ही सुतार टी व्ही मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले आहे . विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी करणारी शाळा म्हणून परिवर्तन शाळेचे नाव दतवाड सह आजूबाजूच्या गावात नावलौकिक झाला आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.