चोवीस वर्षांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा, माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
चोवीस वर्षांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा, माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
सैनिक टाकळी: (प्रतिनिधी)
मैत्री ही सोनेरी धाग्यानी विनलेली असते. त्यातील प्रत्येक धागा हा विश्वासाचा असतो.यामुळेच ती अधिक दृढ होत जाते असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक आर .डी .पाटील यांनी केले. ते हॉटेल सयाजी येथील
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, सैनिक टाकळीमधील १९९८/९९ मधील एस.एस.सी बॅचद्वारे आयोजित केलेल्या शानदार समारंभामध्ये बोलत होते . या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी २४ वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या शिक्षकां सोबत स्नेहमेळावा कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे मोठ्या दिमाखात साजरा केला. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देताना आपल्या जीवनपटाची थोडक्यात माहिती आपल्या सहकाऱ्यांना करून दिली. आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी भारावून गेले होते. यावेळी डी एम शेळके ,उदय पाटील ,एम एम धुमाळे, ए.एच पाटील या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांकडून सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.याचबरोबर विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
येथील इयत्ता दहावीच्या १९९८/९ ९ च्या बॅच ला अध्यापन करणारे ए.एच. पाटील ,डी.एम. शेळके, टी.एम.गायकवाड ,आर.डी.पाटील, विनोद पाटील, उदय पाटील, ए.ए इंगवले, ए.टी.गुरव, बी.एम.कुंभार, एम.एम.धुमाळे, ए.बी.गायकवाड शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले.आभार ए ए.इंगवले यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी खुप परिश्रम घेतले.