Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

जुनी पेन्शन योजना अभ्यास समिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची स्वतंत्र बैठक संपन्न.

 जुनी पेन्शन योजना अभ्यास समिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची स्वतंत्र बैठक संपन्न.



मुंबई :जुनी पेन्शन योजना विषयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात तात्या तसेच राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांना मंत्रालयात अभ्यास समिती बैठकीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने निमंत्रित करण्यात आलेले होते. 

सदर बैठक आज दिनांक 9 मे 2023 रोजी सायंकाळी सात वाजता मंत्रालयात संपन्न झाली.   महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जुनी पेन्शन योजना अभ्यास समिती अध्यक्ष सुबोध कुमार,बक्षी, श्रीवास्तव यांच्या समिती समवेत जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात शिक्षक संघाची भूमिका ठामपणे मांडण्यात आली. जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी सर्व लाभांसह लागू करण्यात यावी,अन्य कुठल्याही प्रकारचे बदल न करता 1982/84 अंतर्गत मिळणारे सर्व लाभ 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावे अशी भूमिका शिक्षक नेते संभाजीराव थोरात तात्या तसेच राज्याध्यक्ष अंबादास वाजे सर यांनी समितीसमोर मांडली. 

समिती सदस्यांनी डीसीपीएस योजनेतील त्रुटी जाणून घेतल्या.एनपीएस व डीसीपीएस योजनेला शिक्षक संघाचा प्रखर विरोध असल्याचे शिक्षक संघाच्या वतीने समितीसमोर सांगण्यात आले.

 यावेळी राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप,राज्य उपाध्यक्ष मिलिंद गांगुर्डे,दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन वडजे, नाशिक तालुका अध्यक्ष प्रदीप पेखळे यांनी चर्चेत सहभाग घेतला.