मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा ,नवनवीन कौशल्य शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या -अजित पाटील
कुरुंदवाड-
मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा ,नवनवीन कौशल्य शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या असे प्रतिपादन अजित पाटील सचिव साने गुरुजी शिक्षण संस्था कुरुंदवाड ते हस्ताक्षर सुधारणा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकमतचे पत्रकार मिलिंद देशपांडे उपस्थित होते.
कुरुंदवाड नगरीत खास उन्हाळी सुट्टी निमित्त साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड येथे हस्ताक्षर सुधारणा वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
हस्ताक्षर ही आपली ओळख असते ज्याचे हस्ताक्षर चांगले त्याला सर्वत्र आदराचे स्थान मिळते सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे सरावामुळे त्यात आणखीन भर होते असे पत्रकार मिलिंद देशपांडे म्हणाले ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हस्ताक्षर सुधारणा कार्यशाळेचा सांगता समारोप करण्यात आले .या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून अजित पाटील सचिव ,साने गुरुजी शिक्षण संस्था, कुरुंदवाड व मिलिंद देशपांडे पत्रकार दैनिक लोकमत हे उपस्थित होते.
कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर सुधारणा वर्गातील अनुभव सांगून आपल्या हस्ताक्षरात कशी सुधारणा झाली याबद्दल माहिती दिली अक्षरात व लिहिण्यात सुधारणा झाल्याचे सांगितले याबरोबरच पालकांनी आपले अनुभव सांगितले त्यानंतर अक्षर संस्कार इन्स्टिट्यूट कोल्हापूर चे मार्गदर्शक शिक्षक सोनाली देसाई व शरद जाधव यांनी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून अजित पाटील सचिव ,साने गुरुजी शिक्षण संस्था, कुरुंदवाड व मिलिंद देशपांडे पत्रकार दैनिक लोकमत यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावना संयोजक महेश तारदाळे तर आभार महादेव गडगे यांनी मानले.