टाकळीवाडी मध्ये भगवान गौतम बुद्ध जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
टाकळीवाडी मध्ये भगवान गौतम बुद्ध जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
समाज घडवण्यासाठी गौतम बुद्धांनी दिलेली पंचशील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान याचाच ध्यास व अभ्यास करावा लागेल सध्या राजकारणात व समाजकारणात प्रचंड उलथापालत होत आहे मात्र भगवान गौतम बुद्धांनी अहिंसेचा मार्ग अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या समाजाला दिला आहे तो मार्गच आपल्याला अवलंबाव लागेल तरच प्रगती होईल महामानवाची जयंती आचार विचाराचा महोत्सव झाला पाहिजे. त्यांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेतले पाहिज. तरच समाज सुधारेल असे उद्गार ज्येष्ठ व्याख्याते मधुकर पाटील यांनी काढले ते टाकळवाडी तालुका शिरोळ येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या २५८६ जयंतीनिमित्त कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते.
टाकळीवाडी ता. शिरोळ येथे महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध २५८६ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ध्वजारोहण, दीप प्रज्वलन, मूर्तीपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.ध्वजारोहण कुरुंदवाड चे माजी नगराध्यक्ष रामभाऊ डांगे व दादासो गोरवाडे चेअरमन भारत विकास सेवा सोसायटी यांच्या हस्ते झाले.
दीप प्रज्वलन अमरसिंह पाटील प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शिरोळ नगरपालिका, दिलीप वसगडेकर सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक, चिंतामणी निर्मळे संचालक देशभक्त रत्नाप्पा कुंभार सहकारी सूतगिरणी, मा.सौ. स्वाती सासणे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद कोल्हापूर, मिलिंद शिंदे माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगरपरिषद, विकास कांबळे सर माजी जिल्हा परिषद कोल्हापूर सदस्य, सुशील कांबळे माजी उपसभापती पंचायत समिती शिरोळ, खंडु मोरे अध्यक्ष शिरोळ तालुका मातंग समाज संघटना, दादासो गोरवाडे चेअरमन भारत विकास सेवा सोसायटी, अजित गोरवाडे माजी चेअरमन भारत विकास सेवा सोसायटी, दगडू माने ज्येष्ठ पत्रकार व प्रहार संघटना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी चे जनसंपर्क अधिकारी विकास चौगुले गणेश पाखरे , नवे दानवाड चे उत्तम कांबळे राहुल माळगेमा.जयपाल कांबळे अध्यक्ष आर.पी.आय. शिरोळ तालुका आठवले गट, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैया यांनी बौद्ध समाजाचे भरभरून कौतुक केले. गावामध्ये फक्त 30 घरे असून कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात संपन्न केल्याबद्दल. यातून एकीचे बळ घेण्यासारखे आहे असे ते बोलताना म्हणाले.
तसेच यावेळी नंदकुमार कांबळे बाळाबाई हक्के पिमु जमादार, बाजीराव गोरे तुकाराम चिगरे, जयपाल कांबळे प्रमिला आवटी भरत पाटील केरबा कांबळे महेश कांबळे ऋषिकेश माळगे, अभिषेक कांबळे सचिन माळगे योगेश कांबळे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठान समितीचे सदस्य व राजश्री शाहू कला क्रीडा व संस्कृती मंडळ चे सर्व सदस्य, गावातील सर्व नागरिक, माता-भगिनी, तरुण मंडळे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, समस्त बौद्ध समाज, गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावातील लोकप्रतिनिधी, गावातील आजी-माजी सैनिक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.