चक्क वळीव पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांने आपला आनंद शेतामध्ये केक कापून साजरा केला.
चक्क वळीव पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांने आपला आनंद शेतामध्ये केक कापून साजरा केला. व पावसाचे स्वागत केले.
दत्तवाड --टाकळीवाडी ता.शिरोळ येथील शेतकरी दादा खोत माजी सैनिक यांनी वळीव पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये केक कापून आपला आनंद साजरा करून पावसाचे स्वागत केले.
टाकळीवाडी मध्ये गेले दोन महिने झाले वळीव पाऊस नव्हता. शेतकरी चातक पक्षाप्रमाणे आभाळाकडे बघत होता. पिके करपत होती उन्हामुळे हे शेतकऱ्याला सहन होत नव्हते.
टाकळीवाडी मध्ये माळ रान भरपूर असल्यामुळे बोर ,विहिरी यांना पाणी कमी आले होते.
पाण्याचे नियोजन होत नव्हते. पिके करपत होती. पिकानी सुद्धा आता धीर सोडलेला होता. शेतकरी चिंताग्रस्त झालेला होता. शेतकऱ्याची झोप उडाली होती.
काल वळीव पाऊस पडल्यामुळे शेतकरी खुश झाला. पिकांना थोडाफार आधार झाला. याचा आनंद एका शेतकऱ्याने केक कापून स्वागत केले.
शेतकऱ्याचे सर्व जीवनमान शेतीवरच अवलंबून आहे. दोन महिने झाले उन्हाळा फार जाणवत होता. वळीव पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्याची झोप उडाली होती. शेतकऱ्यांना बोलवून त्यांनी केक कापून सर्वांचा आनंद वाढवला.आनंद काय असतो हे शेतकऱ्याकडून शिकावे लागेल.
आला रे आला पाऊस आला. शेतकऱ्यांचा राजा पाऊस आला. अशा घोषणा देत आनंद साजरा केला.जय किसान, जय किसान, जय विज्ञान, घोषणा देऊन सर्वांना उत्तेजित केले.
शेतकऱ्याने ऊसाला केक भरवत आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी माजी सैनिक लक्ष्मण निर्मळे, पुंडलिक निर्मळे (शेतकरी), प्रणव कुंभार, आरोही पकाणे , राजनंदिनी निर्मळे ,भोपाल बदामे उपस्थितीत होते.