गुरुदत्त शुगरने दुसरा हप्ता त्वरित द्यावा अन्यथा आंदोलन-धनाजी चुडमुंगे
दत्तवाड --
साखरेचे वाढलेले भाव, वीज निर्मिती व इथेनॉल विक्रीतून मिळालेला ज्यादा फायदा त्याचा ऊस उत्पादक शेतकरी यांना फायदा व्हावा या उद्देशाने कारखानदारांनी दुसरा हप्ता म्हणून पाचशे रुपये तात्काळ शेतकऱ्यांना द्यावेत. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुरमुंगे यांनी दिला ते टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर साखर कारखान्यावर निवेदन देण्यासाठी आले असता बोलत होते.
गुरुदत्त शुगर ने यापूर्वी शेतकऱ्यांना ३१०० ते ३२०० रुपये टनाला दर दिला आहे मात्र यावर्षी सर्वात कमी २९०३ रुपये एफआरपी देऊन शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे मात्र साखरेचा दर यावर्षी ३२०० वरून ३४०० वर गेला आहे याबरोबरच गुरुदत्त शुगर ने वीज निर्मिती करून त्यांना पन्नास रुपये व इथेनॉल निर्मिती करून त्यांना दीडशे रुपये पेक्षा जास्त नफा मिळवला आहे उसापासून मुख्य निर्मिती होत असलेली साखर व त्याचे उपपदार्थ याचे दर वाढलेले असतानाच शेतकऱ्याला मात्र कमी दर मिळत आहे हे चुकीचे असून शेतकरी त्यामुळे कर्जबाजारी झाला आहे.
त्यामुळे कारखानदारांनी तात्काळ दुसरा हप्ता म्हणून पाचशे रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावेत अन्यथा सात दिवसात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी राकेश जगदाळे ,दीपक पाटील ,बाळकृष्ण भोगावे, अण्णासो वडगावे ,अमोल गावडे ,महादेव काळे ,संभाजी माने ,संदीप पाटील, विनोद काटकर आदी उपस्थित होते.
---------------------------------++----------------_----------------------
केंद्र सरकारने गुरुदत्त शुगर ला डिस्टिलरी व विस्तारीकरणासाठी. १४४ कोटी कर्ज सवलतीच्या दरात दिले असून तो सर्वसामान्य जनतेच्या करातील पैसा आहे. त्यामुळे कारखान्याला जनतेच्या पैशातून कर्ज मिळाली आहे हे लक्षात ठेवावे असा इशाराही त्यांनी दिला.
--------------------------------------------------------------------------
मोलॅसिस मध्ये जाणारी साखर व इथेनॉलसाठी मिश्रण करण्याची साखर याचे प्रमाण केंद्र सरकारने घालून दिली आहे मात्र गुरुदत्त शुगर नी याकडे दुर्लक्ष करून जादा साखर चे मिश्रण केले आहे यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत असल्याचा दावा आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुरमुंगे यांनी यावेळी केला.