नरेंद्र विद्यापीठाने दिलेले मानपत्र हे मानपत्र नसून इनाम पत्र -उ स नाईकनवरे
दत्तवाड ---
साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूर शक्तिपीठ असून यातूनच मला शक्तीची प्रेरणा मिळाली आज नरेंद्र विद्यापीठाने दिलेले मानपत्र हे मानपत्र नसून इनाम पत्र असल्याचे भावपूर्ण उद्गार जेष्ठ शिक्षण तज्ञ उ स नाईकनवरे यांनी काढले ते करवीर नगर वाचनालयात झालेल्या नरेंद्र विद्यापीठाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते.
कवीने - लेखकाने लिहित राहावे. आपल्या पुस्तकावर कुणी काही समीक्षा लिहावी अशा अपेक्षेपेक्षा आपल्या शब्दांशी प्रामाणिक राहून लिहा.कविता ही एक गंभीर बाब आहे. एका कवितेची चांगली ओळख ही चांगल्या कादंबरी सारखी असते. आपण लिहीतो पण गंभीर होत नाही. वर्तमानाचे सूक्ष्म बारकावे टिपणे हे लेखकाचे काम असते." असे प्रतिपादन कवी डॉ.चंद्रकांत पोतदार यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
यावेळी स्वर्गीय डॉ. न ना देशपांडे राशिवडेकर उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार आबासाहेब पाटील मंगसुळी, अजित मालंडकर कल्याण, पूजा भडांगे पुणे ,वैष्णवी आदुळकर कोल्हापूर ,हर्षदा सुठनकर बेळगाव, सुभाष वाघमारे खिंडवाडी ,शोभना आगाशे व मंजिरी येडूरकर सांगली श्रीकांत पाटील घुणकी ,उत्तम सावंत काळमवाडी, रंगराव बन्ने बारवाड, वृषाली कुलकर्णी नेवरी यांना तर स्वर्गीय वा. गो. कुलकर्णी चिकोडीकर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सुबोध कुलकर्णी सांगली, सेवावृत्ती स्वर्गीय सौ जानकी न जोशी खडकलाटकर सेवा गौरव पुरस्कार रजनीताई हिरळीकर कोल्हापूर, माझा भाऊ माझी बहीण निबंध लेखन स्पर्धेतील प्रथम बाबासाहेब लाड सरूड द्वितीय स्वाती कोळी सांगली तृतीय साक्षी जाधव कोल्हापूर. वाचनाची आवड विकसित करण्यासाठी मी केलेले उपक्रम निबंध लेखन स्पर्धेतील मनीषा शेणई कोल्हापूर, संजय गोंधळे सांगली ,सरदार पाटील क// बीड. याना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला . गणेश गावकर कोल्हापूर प्रशांत कुलकर्णी कोल्हापूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला .
यावेळी पी एन देशपांडे संपादित महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अरविंद देशपांडे यांनी केले तर काव्यसंग्रहाचे परीक्षण कवी चंद्रकांत पोतदार यांनी केले आभार पी एन देशपांडे यांनी केले तर कार्यक्रमाची सुरुवात गिरीजा गोडे यांच्या जय शारदे या गायनाने झाली तर मोगरा फुलला या गाण्याने गोड शेवट झाला. सूत्रसंचालन मनीषा शेनई यांनी केले.
यावेळी वीणा कुलकर्णी, शिवकुमार तोडकर, हॅपी स्कूल शिरोळच्या प्राचार्य मधुरा देशपांडे, मकरंद देशपांडे उपस्थित होते.
फोटो --शिक्षण तज्ञ उ स नाईकनवरे यांचा मानपत्र देऊन सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष अरविंद देशपांडे सोबत पी एन देशपांडे डाॅ.चंद्रकांत पोतदार व इतर मान्यवर