ऊस दराचे प्रश्न विधानसभेत मांडा आंदोलन अंकुश ची बच्चू कडू यांना साद
ऊस दराचे प्रश्न विधानसभेत मांडा
आंदोलन अंकुश ची बच्चू कडू यांना साद
माजी मंत्री आणि प्रहार चे आमदार बच्चू कडू हे कामानिमित्त सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे काल आले असता आंदोलन अंकुश च्या धनाजी चुडमुंगे यांनी त्यांची भेट घेऊन ऊस दराच्या धोरणातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आणि या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवण्याची विनंती त्यांना केली यावेळी प्रहार चे सांगली जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील उपस्थित होते.
ऊस दर नियंत्रण मंडळाकडून उसाचा अंतिम दर ठरवताना बग्यास चे मूल्य हे 30% धरण्याऐवजी 4% धरून महसुली उत्पन्न काढले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन 700 रुपये अंतिम दर कमी मिळतो ही तरतूद सी रंगराजन समितीने केलेल्या शिफारशी विरोधात आहे त्यामुळे ऊस दराचे विनियमन अधिनियम 2013 च्या नियम 2016 मध्ये बग्यास चे मूल्य 30% धरण्याची दुरुस्ती करून घ्यावी लागेल तसेच मशीन तोड वजावटचा एकतर्फी शासन निर्णया विरोधात पण विधानसभेत प्रश्न उपस्थित करून ही वजावट 2% च्या खाली आणायला भाग पाडा अशीही विनंती त्यांना आंदोलन अंकुश कडून करण्यात आली.
दोन्ही विषयाच्या स्वतंत्र फाईल करून उद्याच द्या मी समजून घेऊन विधानसभेत लक्षवेधी द्वारे हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन असे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी आंदोलन अंकुश चे जिल्हा उपाध्यक्ष उदय होगले तालुकाध्यक्ष दीपक पाटील दत्तात्रय जगदाळे महेश जाधव व प्रमोद बाबर उपस्थित होते.
आंदोलन अंकुश कडून शिरोळ मध्ये उसाच्या वजनातील काटामारी रोखण्यासाठी शेतकरी वजन काटा उभारला जात आहे. हा काटा येत्या हंगामात आम्ही सुरु करणार आहोत आपल्या हस्ते याचे उदघाट्न व्हावे अशी इच्छा व्यक्त करून उदघाटणास येण्याचे बच्चू कडू यांना धनाजी चुडमुंगे यांनी अधिकृत निमंत्रण दिले.