समाज सुधारणेचे केंद्र प्राथमिक शिक्षण : डॉ राजेंद्र कुंभार
समाज सुधारणेचे केंद्र प्राथमिक शिक्षण : डॉ राजेंद्र कुंभार
शिरोळ:समाज सुधारणेचे केंद्र प्राथमिक शिक्षणात आहे.मूल्य व्यवस्थेची बीजे बालवयात रुजली तर शिक्षणातून अपेक्षित क्रांती घडून येईल.या करीता प्राथमिक शिक्षकांनी आपल्या अध्ययनावर आणि विद्यार्थ्यावर प्रेम करावे.बालवयात मिळणारे अनुभव चिरकाल टिकणारे असतात.असे प्रतिपादन बीटस्तरीय मुख्याध्यापक सहविचार सभेत डॉ.राजेंद्र कुंभार यांनी केले.
बीटस्तरीय मुख्याध्यापक सहविचार सभेत ते पुढे म्हणाले, शिक्षकांनी वर्ग खोलीत भाषेचा समजपूर्वक वापर करावा.मुले कृतीतून अधिक शिकत असतात.रंजनातून ज्ञान निर्मिती कशी होईल?याकडे लक्ष द्यावे.
दत्तनगर,हसुर,नांदणी, शेडशाळ आणि अब्दुललाट केंद्रातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा पार पडली.त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. दिवसभर पार पडलेल्या सहविचार सभेत केंद्रप्रमुख आण्णा मुंडे,मुख्याध्यापक प्रकाश नरूटे,दत्तात्रय सूर्यवंशी, अरुणा शहापुरे,सुनील एडके,रामचंद्र लठ्ठे,अविनाश कोडोले,माने,अनिल पवार विषयतज्ञ तसेच बीट विस्तार अधिकारी दीपक कामत यांनी मार्गदर्शन केले.
गटशिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास जवाहिरे,केंद्रप्रमुख अण्णा मुंडे,राजेंद्र यळगुडे,विश्वास मोरे,सलीम जमादार,कुणाल कांबळे व जिल्हा परिषद शाळेतील बीट मधील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.