शिरोळ तालुक्यातील शिक्षकांसाठी 'मी वाचणारच ' कार्यशाळा संपन्न.
शिरोळ तालुक्यातील शिक्षकांसाठी 'मी वाचणारच ' कार्यशाळा संपन्न.
जयसिंगपूर :जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व शिरोळ पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिलीच्या शिक्षकांसाठी 'मी वाचणारच' ही कार्यशाळा झेले हायस्कूल,जयसिंगपूर येथे संपन्न झाली. गतीमंद विद्यार्थी ही वाचू शकणारा.कमी वेळेत,कमी श्रमात गुणवत्ता देणारा हा उपक्रम प्रथमच कोल्हापूर जिल्हयात आयोजित करण्यात आला होता.गतवर्षी सोलापूर जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता.
सदर कार्यशाळेसाठी डायट कोल्हापूरच्या डॉ.अंजली रसाळ वरिष्ठ अधिव्याख्याता, शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,अनिल ओमासे, केंद्रप्रमुख आण्णा मुंडे,दत्तात्रय जाधवर,बीआरसी समन्वयक नईमा काझी,अर्पणा मोकाशी,प्रतिमा माने,अनिल पवार,नितीन कांबळे,शंकर बरगाले यांच्या नियोजनाने कार्यशाळा संपन्न झाली.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे तज्ञ शिक्षक किरण बाबर यांनी मार्गदर्शन केले.इयत्ता पहिलीला शिकवणारे जिल्हा परिषदेचे 153 व नगरपालिकेचे 20 असे एकूण 173 शिक्षकांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.सदर कार्यक्रमात स्वागत शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत यांनी केले.प्रास्ताविक डॉ.अंजली रसाळ यांनी केले. पहिलीचा वर्ग तयार होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी या उपक्रमाकडे सकारात्मक दृष्टीने बघावे असे प्रतिपादन केले.सर्व शिक्षकांनी पट वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी भारती कोळी यांनी केले.सदर कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली.आभार मनोजकुमार रणदिवे यांनी मानले.अप्रगत मुलांच्यासाठी हा उपक्रम राबवा. असे आवाहन त्यांनी केले.