चंदूरटेक टाकळी दरम्यानच्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री सतीष जारकीहोळी
चंदूरटेक-सैनिक टाकळी दरम्यानच्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करा
जिल्हा पालकमंत्री सतीष जारकीहोळी यांची अधिकाऱ्यांना सूचना
सैनिक टाकळी
कृष्णा नदीवर चंदूरटेक ते सैनिक टाकळी दरम्यान निर्माण करण्यात येत असलेल्या पुलाची जिल्हा पालकमंत्री सतीष जारकीहोळी यांनी नुकतीच पाहणी केली. तसेच सार्वजनिकांच्या तातडीने काम पूर्ण करण्यात यावे व वाहतूकीस खुला करण्यात यावा अशी सूचना त्यांनी दिली.
कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील संपर्क वाढीसाठी चिकोडी तालुक्यातील चंदूर टेक ते सैनिक टाकळी दरम्यान कृष्णा नदीवर पुल निर्माण करण्यात येत आहे. शिवाय कल्लोळ येडूर दरम्यान कृष्णा नदीवरही पुल व बंधारा निर्माण करण्याचे काम संथपणे सुरु असल्याने मंत्र्यांनी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्यासह कामाची पाहणी केली.
या पुलामुळे सर्वसामान्यांची फार मोठी सोय होणार असल्याने पुलाचे दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना सूचना देवून काम तातडीने पूर्ण करुन घ्यावे अशी सूचना त्यांनी दिली. तसेच चिकोडी येथे निर्माण करण्यात येत असलेल्या न्यायालय इमारतीच्या बांधकामांचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरीक व अधिकारी उपस्थित होते.