आत्मक्लेष आंदोलनाला दत्तवाडकरचा पाठिंबा
इचलकरंजी :
मणिपूरसहित देशातील इतर ठिकाणी महिलांवर अत्याचार करणारे मोकाट सुटलेले असताना एक जबाबदार नागरीक या नात्याने प्रायश्चित म्हणून इचलकरंजी येथे महात्मा गांधी पुतळ्याशेजारी ७२ तासांचे आत्मक्लेश अन्नत्याग सत्याग्रहास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सुरवात केली आहे. या प्रायचित्त अन्नत्याग आत्मक्लेष आंदोलनाला दत्तवाड येथील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आज भेट देऊन पाठिंबा दिला.
दि. २४/२५/२६ जुलै रोजी इचलकरंजी गांधी पुतळा येथे मणिपूर येथे झालेल्या अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी 'एक सही संतापाची' ही मोहिम राबवली जात आहे.
या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी दत्तवाड तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत सदस्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी महिला कार्यकर्ते यांनी आज इचलकरंजी येथे जाऊन माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन या मोहिमेला पाठिंबा दिला
यावेळी. सौ प्रियंका चौगुले ,सौ ज्योती पाटील ,सौ संगीता दानोळे ,सौ बिबाताई सिदनाळे ,सौ रेखा सुतार
सौ राजेश्री सुतार ,सौ कुसुम कलगी ,श्री विवेक चौगुले ,श्री सचिन हेमगिरे ,श्री भूषण नेजे ,नभिराज दानोळे
,आण्णासो खडकोळे. ,शिवाजी खडके ,दर्शन धुपदाळे
रावसो धोतरे इत्यादी उपस्थित होते.
दि. २६ जुलै रोजी. सं ७ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी पुतळा असा कँडल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान राजू शेट्टी यांनी केली आहे.