दत्तवाड .
गळती असलेल्या काळमवाडी धरणातील पाण्याचे कोल्हापूर रहिवाशांना स्वप्न दाखवून राज्यकर्ते घोर फसवणूक करत आहेत तर दुसऱ्या बाजूला ज्यांनी जमिनी दिल्या धरणग्रस्ताच्या वसाहती करून घेतल्या त्या दूधगंगा काठावरील शेतकऱ्या वर अन्याय सुरू असून इचलकरंजी पाणी योजना रद्द करावीच याबरोबरच धरणाची गळती काढल्याशिवाय कोल्हापूर थेट पाणी योजना सुरू करू नये अशी मागणी सुरू दूधगंगा काठातील शेतकऱ्यांतून सुरू झाली आहे. यामुळे कोल्हापूर शहराचा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर ते पाणी योजनेच्या जाकवेलमध्ये सध्या पाणी आले आहे तर जिल्हाधिकारी यांनी इचलकरंजी पाणी योजनेसाठी जागेची मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र धरणाची गळती काढल्याशिवाय कोल्हापूरची योजना सुरू करू नये तर इचलकरंजी योजना रद्द करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कळमवाडी धरणातून थेट पाणी योजना करून कोल्हापूर शहराला पाणी देण्याची योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र धरणात असणाऱ्या गळतीचा प्रश्न निर्माण झाल्याने धरणातील सहा टीएमसी पाणी सोडून देण्यात आले होते. यामुळे दूधगंगा काठावरील नागरिकांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पुढील वर्षी देखील गळती न काढल्याने पाणीसाठा कमी करावा लागणार आहे त्यामुळे पुढील उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवणार आहे.
काळमवाडी धरणातील गळतीचा प्रश्न गेली वीस पंचवीस वर्षे सुरू असतानाच या धरणातूनच कोल्हापूरला पाणी देण्याचा परवाना कसा देण्यात आला. पंचवीस वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार निवेदिता माने या धरणातील गळती बघण्यासाठी गेले असतानाच लिफ्ट मध्ये अडकल्या होत्या तेव्हापासून आजतागायत धरणाची गळती निघाली नाही. त्यामुळे धरणात पाणी किती राहणार व त्याची नियोजन कसे करणार यासंबंधी संपूर्ण माहिती दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांना दिल्याशिवाय व गळती काढल्याशिवाय इचलकरंजी पाणी योजना रद्द करावीच याबरोबरच कोल्हापूरची थेट पाणी योजना सुरू करू नये अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
------------------------------------------------------------------------------
काळमवाडी धरणातील एकूण पाणीसाठा २४ टीएमसी असून यातील ४ टीएमसी कर्नाटक साठी राखीव आहे. जर गळती साठी सहा टीएमसी पाणी सोडले तर उर्वरित १४ टीएमसी पाण्यावर दूधगंगा वेदगंगा सहकालव्यात सोडणाऱ्या पाण्याचे नियोजन कसे होणार मग कोल्हापूरलाच पाणी शिल्लक राहत नाही यामुळे प्रथम गळती काढावी मगच कोल्हापूरची थेट पाणी योजना सुरू करावी अशी आमची मागणी आहे.
राजगोडा पाटील (गुमटे ) दत्तवाड . ता शिरोळ