दत्तवाड यड्रावकर ग्रुपच्या वतीने, रक्षाबंधनाच्या आशा स्वयंसेविकांना दिले भेटवस्तू*
दत्तवाड : प्रतिनिधी
हिंदू धर्मानुसार नारळी पौर्णिमेनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या रक्षाबंधन हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. पवित्र नात्याचं पवित्र रक्षाबंधन म्हणजे बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून तिची रक्षा करण्याचे वचन भावाने देतो. याच बहीण भावाचं पवित्र नात्यातून रुसवे - फुगवे सर्व काही विसरून निखळ आणि निस्वार्थ प्रेमाच्या नात्याचं बंधन म्हणजे रक्षाबंधन. याच कार्यक्रमाद्वारे दत्तवाड येथील डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार तथा डी.एन. सीदनाळे यांच्या पुढाकाराने दत्तवाडच्या ९ स्वयंसेवीकेना रक्षाबंधनानिमित्त भेटवस्तू देऊन सामाजिक कार्यातून यड्रावकर ग्रुपने बहिण भावाचं नातं जोपासली.
दत्तवाड येथील आशा स्वयंसेविकेने आजरोजी तन - मन - धन सर्वकाही विसरून या साऱ्याजणींनी साथीच्या आजारामध्ये संकटाच्या महामारीला आरोग्य सेवा पुरवणे व शून्य वयो गटापासून ते वृद्धवयो गटापर्यंत आरोग्याची सेवा पुरवणाऱ्या अशा स्वंयसेविकेंना गेली दोन वर्षे यड्रावकर ग्रुपने रक्षाबंधनानिमित्त भेटवस्तू देऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासून योगदान राबवत आहे. या सामाजिक कार्यक्रमा वेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच मनीषा प्रकाश चौगुले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार सिदनाळे, तंटामुक्त अध्यक्ष ॲड. सुरेश पाटील, प्रभू चौगुले, नाना नेजे, लाला मांजरेकर, सागर कोळी, भालचंद्र तोडकर, अकबर काले, कल्लाप्पा कडाके व बाळासो चौगुले आदी मान्यवरांच्यासह अशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.