विषाणू संसर्ग काळात डोळ्याची योग्य काळजी घेणे आवश्यक : डॉ सौ शितल गवळी रोटरी हेरिटेज व गवळी हॉस्पिटल आयोजित नेत्ररोग तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद
शिरोळ : प्रतिनिधी
:विषाणू संसर्ग काळात डोळ्याचे अनेक आजार उद्भवतात विशेषता पावसाळ्यात डोळे येण्याची साथ येते यावेळी डोळ्याची योग्य काळजी घेत वेळेत औषधोपचार करून घ्यावेत आणि आपल्या डोळ्याची निगा राखावी असे आवाहन येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ सौ शितल गवळी यांनी केले
येथील बालरोगतज्ञ डॉ अतुल पाटील यांच्या मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिक येथे रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी व गवळी हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत नेत्ररोग तपासणी व औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी डोळ्यांचे आजार बाबत कशी काळजी घ्यावी याविषयी डॉ सौ शितल गवळी यांनी मार्गदर्शन केले
धन्वंतरी देवी व रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हरीश यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले डॉ अतुल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रोटरीच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांचे आरोग्य संपन्न जीवन जपण्यासाठी अशी आरोग्य तपासणी शिबिर सातत्याने आयोजित केले जातील तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून रोटरीचे कार्य सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी आभार मानले
नेत्ररोग तज्ञ डॉ शितल गवळी सहाय्यक ज्योती बुरसे स्वाती पाटील अलताफ आवळेकर यांनी उपस्थितांची डोळे तपासणी करून उपचारासंबंधी मार्गदर्शन केले तसेच डोळे येण्याची साथ आटोक्यात येण्याकरिता रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्यावतीने मोफत औषधाचे वाटप करण्यात आले
यावेळी रोटरी क्लब हेरिटेज सिटीचे सेक्रेटरी तुकाराम पाटील ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे इव्हेंट चेअरमन विवेक फल्ले सदस्य भरत गावडे उल्हास पाटील चंद्रकांत भाट राहुल माने सचिन सावंत यांच्यासह सर्व सदस्य सौ चित्रलेखा पाटील तृप्ती पाटील उत्तमराव पाटील दिलीपराव माने शिवाजीराव पाटील आप्पासाहेब पुजारी अनिल कुंभार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते