Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

पतसंस्था टिकवण्यासाठी कर्मचार्यांचे भविष्य निश्चित असले पाहीजे*...... रमेशकुमार मिठारे, राज्य उपाध्यक्ष पतसंस्था कर्मचारी संघटना.

कोल्हापूर


                   अर्थव्यवस्थेत सहकारी  पतसंस्था म्हणजे आर्थिक कणा आहे.अडी-अडचणीच्यावेळी पतसंस्था कर्मचारी एटीएम मशीन प्रमाणे सेवा देत असतात. मात्र पतसंस्था कर्मचाऱ्यांना निश्चित वेतनश्रेणी त्याच्या भविष्याची सुरक्षितता नसल्याने कर्मचारी उदासीन आहे.नियामक मंडळाने पतसंस्थेकडून अंशदान स्वरूपात रक्कम भरणेची सक्ती केली होती. अशावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पतसंस्था कर्मचारी संघटनेने पतसंस्था पदाधिकाऱ्यांना एकत्रित संघटीत करून, शाहु स्मारक भवन,दसरा चौक कोल्हापूर. येथे बैठक घेऊन अंशदानास विरोध केला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थेचे दोनशे दोन कोटी रुपये भरणेचे थांबले आहे.त्यामुळे पतसंस्था व्यवस्थेमधील कर्मचारी हा घटक महत्त्वाचा असुन त्यांना सेवानियम, भविष्य निर्वाह निधी,उपदान लागु करणेबाबत शासनाने सक्ति केली पाहिजे. काही ठिकाणी पतसंस्था कर्मचाऱ्यांच्या वरती कर्जदारांच्याकडून धमक्या व हल्ले होत आहेत त्या बाबतीत सेवकांना संरक्षण देऊन हल्लेखोरांच्या वर तातडीने कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे  याबाबत राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेचे कार्य चालू असलेचे महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेशकुमार मिठारे यांनी करवीर तालुका पतसंस्था कर्मचारी संघटना स्थापनेच्या बैठकीत व्यक्त केले.

        या बैठकीस करवीर तालुक्याचे सहायक निबंधक प्रेमदास राठोड हे अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक निबंधक राठोडसो यांनी करवीर तालुक्यातील पतसंस्थाना सेवानियम लागु करावेत असा आदेशही यावेळी पत्राद्वारे दिला त्यामुळे सहायक निबंधक राठोडसो  व त्यांचे सहकारी संदीप पाटीलसो यांचे कर्मचार्याकडून अभिनंदन करण्यात आले.यावेळी हातकणंगले तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे,चंदगड तालुक्याचे कार्याध्यक्ष शांताराम हजगुळकर, तात्यासाहेब मोहीते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक एस.टी.जाधव यांनी मार्गदर्शन केले.

        यावेळी करवीर तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे नुतन संचालक मंडळ पदी अनिल शिरगांवे (पाचगाव),भिकाजी वनारे (वरणगे पाडळी), सदाशिव केसरकर (वडणगे), स्वप्निल पाटील (वरणगे पाडळी), पांडुरंग बिरंजे (वाकरे), विष्णू राऊत (कुडित्रे),तानाजी नाटेकर (हणमंतवाडी),आनंदा शेटे (हसुर),वाकोजी देसाई (कुरुकुली),संजय देसाई (उजळाईवाडी),राजगोंडा पाटील (चिंचवाड), सदाशिव पाटील (देवाळे),रंगराव शेळके (वाशी), भिमराव पाटील (गोकुळ शिरगाव),स्वाती दाभोळकर (गांधीनगर) यांची निवड करण्यात आली.सदरचा कार्यक्रम हा शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथील मल्टीपर्पज हॉल याठिकाणी १८ ऑगस्ट रोजी पार पडला.या बैठकीत करवीर तालुक्यातील पतसंस्था कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.स्वागत वाकोजी देसाई, प्रस्ताविक -अनिल शिरगांवे तर आभार रंगराव शेळके यांनी मानले