जगाचा इतिहास शिक्षकांशिवाय लिहला जाणार नाही: मीना शेंडकर शिक्षक दिनी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यावतीने शिक्षकांचा सन्मान
शिरोळ / प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांना घडवून समाजात आदर्श नागरिक बनवण्यासाठी शिक्षकच आपल्या प्रयत्नांची पराकाष्ट करीत असतात यामुळे जगाचा इतिहास शिक्षकाशिवाय लीहीला जाणार नाही शिक्षक दिनाला जेव्हा सन्मान मिळेल त्यावेळी अनेक मान्यवर मंडळी शाळेच्या वर्गात येवून विद्यार्थ्यांना शिकवतील असे मत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सौ . मीना शेंडेकर यांनी व्यक्त केले शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ . इंद्रायणी पाटील परिवारांच्या वतीने शिरोळमधील सर्व आजी माजी शिक्षकांचा सन्मान व सत्कार समारंभ टारे क्लब हाउस येथे आयोजीत करण्यात आला होता . या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मीना शेंडकर या बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सौ .भारती कोळी या होत्या .
बोलताना शेंडकर पुढे म्हणाल्या की डॉक्टर चुकला तर एक पेशंट मरेल इंजिनिअर चुकला तर एक गाव उद्धवस्त होईल पण एक शिक्षक चुकला तर दहा पिढ्या चुकल्या जातील त्यामुळे आदर्शवत भावी पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले . स्वागत शरद सुतार तर प्रास्तावीक भगवान कोळी यांनी केले . नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले की शिक्षकांनी दिलेला आदर्श घेऊनच आपली पिढी वाटचाल करीत असते शिक्षकच समाजाची ऊर्जा आणि दिशा आहेत समाजात बदल घडवण्याची ताकद शिक्षकांच्यात आहे शिक्षकदिनी सर्व शिक्षकांचा सन्मान करण्याचा भाग्य या निमित्ताने आम्हाला लाभले
प्राथमिक शिक्षक किरण पाटील, शिरोळ पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव , शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके, प्रा महेश कळेकर यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत, अनिल ओमासे, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुनिल एडके , माजी जि प सदस्य सौ . इंद्रायणी पाटील, बजरंग काळे परशराम चव्हाण, बाळासो कोळी, नामदेव सन्नके , बाजीराव कोळी, मौलाअली मुल्ला, आनंदराव शिंदे, राजेश यादव, रमजान पाथरवट, सुनिल कोळी , वहिदा मुल्ला, संगीता सुतार , सुनंदा पाटील, यशवंत कांबळे, नुरमहंमद मुल्ला , विनोद कदम, उत्तम कोळी, सविता जाधव, तुकाराम गंगधर, वजीर गवंडी, आनंदा पुजारी, अविनाश माने, शिवाजी पुजारी , मनोज रणदिवे, धनाजी आवळे शिरोळ पालिकेचे नगरसेवक पदाधिकारी यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार चंद्रकांत गावडे यांनी मानले .