अल्लाबक्ष नदाफ म्हणजे संघर्षाची गुपित रहस्ये शोधणारा शिक्षक :लेखक अशोक गायकवाड.
अकिवाट :मराठी विद्या मंदिर बस्तवाडचे अध्यापक व अकिवाटचे नागरिक अल्लाबक्ष इमाम नदाफ यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ बसव मंटप अकिवाट येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऋणानुबंध शैक्षणिक मंचचे अध्यक्ष अशोक भुजवडकर होते. यावेळी शिवार वार्ताच्या वतीने विशेषांकाचे प्रकाशन झाले. ग्रामपंचायत अकिवाट, बस्तवाड,राजापूर,विविध शिक्षक संघटना,नातेवाईक, ग्रामस्थ,पालक व मित्रपरिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांनी नदाफ सरांचे कौतुक करून अभिनंदन केले.
याप्रसंगी धैर्यशील सावंत,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,सरपंच वंदना पाटील,रमिजाबी नदाफ, कादरभाई नदाफ,सद्दाम पिंजारी,राहूल देवरे,राहूल कांबळे,महेश गाडेकर,इंद्रजीत बन्ने,अमन नदाफ,जैनुद्दीन नदाफ,तात्यासो चौगुले,श्रेणिक चौगुले,रविकुमार पाटील,सुनिल एडके,सुकुमार पाटील,के.व्ही.पाटील,अशोक गायकवाड,बाळसिंग रजपूत,कुमार तवंदकर,कुमार शिरढोणे,अशोक धनगर,दानू पाटील,धुळाप्पा दिवटे,मोहन ढवळे,जावेद जमादार,मनोज रणदिवे,संतोष जुगळे,पत्रकार संतोष तारळे,राकेश माने, गणपती कागे,दिलीप कोळी,रमेश कोळी,दत्तात्रय जाधवर,अण्णा मुंडे,सुरेश कोळी,असिफ मुजावर,रमजान पाथरवट यांचेसह मित्रपरिवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी शब्बीर नदाफ, मेहबूब मुजावर,महंमद मुल्ला, बाळासाहेब कोळी,रियाज बाणदार,राजेशखन्ना पानारी, नंदकुमार सोनार,राजकुमार वाघमोडे,विनोद माने,जयानंद बेरड,सुनिल कोळी व सिध्दीविनायक तरूण मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभले.
प्रास्ताविक अशोक कोळी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व मानपत्र वाचन दिलीप शिरढोणे यांनी केले.