*उसाच्या दराची कोंडी फुटत नाही तोपर्यंत तोडी घेऊ नका* *दत्तवाड येथे दिले सरपंचांना निवेदन*
दत्तवाड स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि गावातील शेतकरी यांनी आज दत्तवाड येथे राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रा पाठिंबा म्हणून गावात कोणीही ऊस तोड घेऊ नये असा निर्णय घेतला. जोपर्यंत मागील हंगामातील चारशे रुपये प्रतिटन दुसरा हप्ता आणि चालू हंगामतील दर ठरत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोड घेऊन ये अशा आशयाचे निवेदन सरपंच चंद्रकांत कांबळे ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण यांना देण्यात आले.
दतवाड ग्रामपंचायतच्या ऑक्टोबर महिन्यात पंचवीस तारखेला झालेल्या ग्रामपंचायत मासिक सभेत. ग्रामपंचायत सदस्यांनी या संबंधित ठराव केला आहे याचे सूचक प्रियांका चौगुले तर अनुमोदक प्रवीण सुतार यांनी केले आहे.
यावेळी शितल धुपदाळे, अजित चौगुले, युवराज माने, मलगोंडा पाटील, राजू पाटील सुळकुडे, विवेक चौगुले ,एन एस पाटील ,अकबर काले, प्रकाश चौगुले, राजू पाटील ,देवराज पाटील ,शितल सूरवशी ,प्रमोद पाटील संजय पाटील ,प्रवीण सुतार, सचिन हेमगिरे, शामराव सुतार,बाबू मुल्ला , इलाई अपराध, संजय धनगर, यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.