घोसरवाडमध्ये दत्तवाड केंद्रस्तरीय तिसरी शिक्षण परिषद संपन्न.
घोसरवाड:
येथील कुमार विद्या मंदिरमध्ये दत्तवाड केंद्रस्तरीय तिसरी शिक्षण परिषद बुधवार दि.४ ऑक्टोबर २०२३ रोजी संपन्न झाली.
स्वागत शामराव कांबळे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय कमते यांनी केले.अध्यक्षस्थानी केंद्रीय प्रमुख रमेश शंकर कोळी होते.
निपुण भारत विषयांवर बाळासो यादव यांनी निपुण भारत अभियान अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. गुणवत्ता विकास व शिरोळ टॅलेंट सर्च याविषयी राजू जुगळे यांनी मार्गदर्शन केले.केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे यांनी स्लॅश(SLAS) यांविषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी महावीर कांबळे, कुमार मुरगुंडे,बाळासो कांबळे,विरुपाक्ष खोत या दत्तवाड केंद्रांत हजर झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.
दत्तवाड केंद्रातील केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे, मारुती तराळ,संजय दळवी, सहदेव माळी,गणपती एकसंबे,दिलीप शिरढोणे यांचेसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी दशरथ खोत, नंदकुमार पवार,अनिल मंगावे, सुशांत कांबळे,संध्या कमते, वैशाली कुटवटे यांचे सहकार्य लाभले.