शीतपित्त (अंगावर पित्त उठणे )- कारणे व उपाय
शीतपित्त (अंगावर पित्त उठणे )- कारणे व उपाय
ह्या विकारात सर्वांगास अतिशय खाज सुटते.खाजवावे त्या ठिकाणी पित्ताच्या लाल गाठी उठतात. प्रकृतीला न मानवणारा पोटात गेल्यास हा विकार होतो.
कारणे -
बऱ्याच दिवसापासून पेन किलर टॅबलेट घेणे, चहा, कॉफी, अतिथंड हवा, उडीद, पापड, लोणचे, खारट पदार्थ, दही, वांगी, शेंगदाणे- वाळलेले खोबरे (ग्रेव्ही )मसालेदार /तेलकट पदार्थ. यांचा वापर.
उपाय -
1)आमसोलाचे पाणी अंगास चोळावे
2)दोन चमचे त्रिफळा चूर्ण दिवसातून 2वेळा घेणे गरम पाण्यातून घ्यावे
3)गुळवेल, धने, कडुलिंब ह्या सर्वांचे चूर्ण एकत्र करून 2चमचे औषध व दोन वाटी पाणी घेऊन त्याचे 1वाटी होईपर्यंत उकळावे व दिवसातून 2वेळेस घावे.
4)पोट साफ ठेवावे.
5)दोन चिमूटभर काळे मिरे, तुपात मिसळून खाण्यास द्यावे.
डॉ. ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
9175723404,7028612340