जगतज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाची अंमलबजावणी व उर्वरित पोट जातीचा ओ.बी.सी. प्रवर्गात समावेश करा....अँड. सुरेश पाटील (दत्तवाडकर)
दत्तवाड. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने लिंगायत समाजातील युवा वर्गासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाची घोषणा करुन 7 ते 8 महिने झाले असून आजअखेर कोणत्याही लिंगायत बांधवाला लाभ मिळाला नाही. या अंतर्गत कर्जव्याज परतावा, गट कर्ज योजना घोषित करून यासाठी आदरणीय शिंदे व फडणवीस सरकारने लिंगायत बांधवासाठी या महामंडळासाठी 50 कोटीची तरतूद केली आहे.
मात्र याची अंमलबजावणी अजून झालेली नाही त्यामुळे त्यासंदर्भात त्वरित परिपत्रक काढून या योजनेच्या आमलबजावणीसाठी संकेतस्थळ निश्चित करून त्याद्वारे लवकरात लवकर लाभ गरजू लिंगायत बांधवाना मिळणे अपेक्षित असे.तसेच लवकरच लोकसभा किंवा इतर निवडणुका घोषित झाल्यास या योजनाच्या अंमलबजावणी होणे कठीण होईल व या योजनापासून गरजू लाभार्थी वंचित राहतील. अशी भीती त्यांनी व्यक्त केली
2014 मध्ये लिंगायत समाजातील काही पोट जाती महाराष्ट्र शासनाने OBC इतर मागास वर्गमध्ये समाविष्ट केलेले आहेत.मात्र त्यावेळी लिंगायत समाजातील लिंगायत, वीरशैव, पोटजाती ज्या तेलंगाणा व कर्नाटकात इतर मागासावर्गात समाविष्ट केलेल्या आहेत त्याप्रमाणे लिंगायत जातीमधील लिंगायत, पंचम/पंचमसाली, चतुर्थ , शिलवंत, या पोटजातीदेखिल समाविष्ट करावेत.
आता तसे पाहायला गेले तर लिंगायत समाजातील अल्पभुधारक, भूमिहीन, बांधव यांना आपल्या मुलांना शिक्षण देणे , फी भरणे कठीण जात आहे त्यामुळे असे हुशार मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
तसेच अनेक युवा वर्गाला व्यवसाय करणेसाठी लागणाऱ्या भाग भांडवल कमी पडत आहे त्यामुळे जगतज्योति महात्मा बसवेश्वर महामंडळ याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात लवकरच सर्व लोकप्रतिनिधींना तसेंच प्रशासकीय अधिकारी जसे तहसीलदार , जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे .
यानंतर महिन्याभरात याची अंमलबजावणी झाली नाहीतर प्रशासकीय अधिकारी कार्यालये जसे तहसिलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन,साखळी उपोषण, मोर्चे, इत्यादी मार्गाचा अवलंब करणेत येईल.
आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 600000 (सहा लाख) , संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 1 कोटी तर संपूर्ण देशात सुमारे 7.5 कोटी लिंगायत बांधव असून त्याला शासन स्तरावर न्याय मिळावी ही अपेक्षा आहे असे वीरशैव् व पंचमसाली लिंगायत समाजाचे राज्य उपाध्यक्ष अँड. श्री. सुरेश पाटील (दत्तवाडकर) यांनी व्यक्त केली.
तसेच भविष्यकाळातील दिशा परमपूज्य बसवलिंग स्वामीजी व राज्य अध्यक्ष याच्या मार्गदर्शनाखाली करणेत येईल असेही ते पुढे म्हणाले