Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

नगरसेवक पंडित काळे यांनी भत्त्याची रक्कम दिली नगरपालिका कर्मचाऱ्यांना



 नगरसेवक पंडित काळे यांनी भत्त्याची रक्कम दिली नगरपालिका कर्मचाऱ्यांना

 शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक पंडित काळे यांनी आपल्या  पाच वर्षाच्या कालावधीत नगरसेवक पदाचा मिळालेली भत्ताची रक्कम आणि तेवढीच स्वतःकडील रक्कम अधिक करून रकमेचा धनादेश आपल्या परीने पालिका कर्मचाऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने शिरोळ नगरपरिषद कर्मचारी संघटनेकडे सुपूर्त केला

शिरोळ नगरपालिकेतील प्रथम स्वीकृत नगरसेवक पंडित काळे यांनी नगरसेवक पदासाठी मिळणारा भत्ता स्वतःसाठी खर्च न करता मिळालेली भत्त्याची सर्व रक्कम आणि तेवढीच स्वतःकडील रक्कम अधिक जमा करून मदत म्हणून तो धनादेश शिरोळ नगरपरिषद कर्मचारी संघटनेकडे दिला नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते शिरोळ नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप चुडमुंगे यांच्याकडे तो धनादेश देण्यात आला आला

यावेळी दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर रोटरी क्लब शिरोळचे सदस्य बापूसाहेब गंगधर चंद्रकांत भाट सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे गजानन कोळी केरबा लोहार नगरपालिकेचे माजी उपमुख्याधिकारी विजय परभत पालिकेचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियांता अमन मोमीन कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुंगे लिपिक विनायक लोंढे ज्ञानेश्वर कंदले मल्लिकार्जुन बल्लारी पोपट आदके अमोल बन्ने विनोद बिराणे प्रशांत आवळे स्नेहल कोळी सीमा जाधव गणेश केंगारे मल्लिकार्जुन अंजनाप्पा बल्लारी मारुती बल्लारी रायफल कांबळे रूपचंद कांबळे संजय कांबळे दत्तात्रय शिंदे निशिकांत कांबळे यांच्यासह पालिकेचे  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते