*दत्तवाड येथे मोदी सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा*
*दत्तवाड येथे मोदी सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा*
लोक कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी व अंमलबजावणी साठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन सर्व देशभर सुरु आहे त्या अंतर्गत दत्तवाड येथे या संकल्प रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी विविध योजनांच्या लाभ घेतलेल्या अनेक लाभार्थ्यांनी पीएम किसान, घरकुल, मातृ योजना, उज्वला गॅस योजना , बचत गट, मुद्रा योजना, आयुष्यमान भारत योजना,व इतर योजनांच्या लाभार्थ्यांनी स्वतःहून घेतलेल्या लाभाची माहिती सांगितली. व दहा वर्षे मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या कामाबद्दल आभार व अभिनंदन केले.
प्रथम उपसरपंच अकबर काले यांच्या हस्ते पुष्पहार घालून रथाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्वसामान्य लोकांना सुरू असलेल्या विविध योजनांच्या माहितीचे चलचित्र दाखवण्यात आले भाजप तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील व सुरेश पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. विकसित भारताची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
यावेळी विस्ताराधिकारी रवींद्र कांबळे, तलाठी मुजावर, ग्रामसेवक संतोष चव्हाण , कृषी सहाय्यक भमाने, आरोग्य सेवक विष्णू पोतदार, मेरी कानिटकर ,फरनाज सनदी, बचत गटाच्या गोटखिंडे , भाजपा तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील, उपसरपंच अकबर काले, प्रकाश चौगुले, ऍड. सुरेश पाटील, दत्तवाड भाजपा अध्यक्ष कुमार पाटील, दादासो पोवाडी, माजी सरपंच आण्णासाहेब पाटील, महावीर नेजे, बाहुबली पाटील ग्रामपंचायतचे सदस्य, तलाठी ऑफिसचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, लाभार्थी, आशा सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.