ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये मकरंद मुकुंद देशपांडे यांना ब्रम्हाअर्जुन पुरस्कार
जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड -
दत्तवाड.
श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे झालेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये मकरंद मुकुंद देशपांडे यांना ब्रम्हाअर्जुन पुरस्कार परिषदेचे संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ब्राह्मण ऐक्य परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री धनंजय मुंढे, प्रीतम मुंडे ,आमदार नीलमताई मुंदडा ,नाशिकचे महंत सुधीर दास महंत, अभिनेत्री केतकी चितळे, उद्योगपती विवेक देशपांडे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
रविवार दिनांक 25 रोजी परळी वैजनाथ येथे एक दिवसीय राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .
मकरंद देशपांडे हे गेली पंचवीस वर्षे विविध सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून ब्राह्मण युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी वेद प्रतिष्ठान ची स्थापना केली आहे या प्रतिष्ठान मार्फत महाराष्ट्रातील अनेक युवकांना शैक्षणिक , रोजगार व उद्योग उभारण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे नरसिंह वाडी येथे झालेल्या ब्राह्मण अधिवेशनाचे ते एक प्रमुख होते याचा विचार करून त्यांना ब्रम्हा अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दोन सत्रात झालेल्या या परिषदेमध्ये सुशील कुलकर्णी आता उठवू सारे रान , विवेक देशपांडे चला उद्यामी बनवूया, केतकी चितळे ब्राह्मण दमण मुस्कटदापी आणि धैर्य, पंचांगकर्ते मोहन दाते, डॉक्टर मंजुषा ताई कुलकर्णी प्राध्यापक महेश पाटील शिक्षणतज्ञ भूषण धर्माधिकारी विवेक कुंभेजकर दीपक करालकर श्रीपाद कुलकर्णी विजय पाटील, यांचे व्याख्याने झाली.